शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सिंचन विहिरींची २१३२ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 00:40 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचन विहिरींची २ हजार १३२ कामे पूर्ण झाली असून शेततळ्याची १३९ कामे पूर्णत्वास गेली असल्याचा अहवाल या विभागाने शासनाला सादर केला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना काम मिळावे, यासाठी विविध कामे हाती घेण्यात येत असतात. या अंतर्गत २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यात सिंचनाची २ हजार १३२ कामे पूर्ण करण्यात आली. तर २ हजार ९७७ कामे या वर्षाअखेरीस सुरु असल्याची माहिती या विभागाने दिली आहे. शेततळ्याची जिल्ह्यात १३९ कामे पूर्ण झाली असून ४७५ कामे सुरु असल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात भूविकासाची तीनकामे पूर्ण झाली असून ४२ कामे सुरु आहेत. भारत निर्माण, राजीव गांधी सेवा केंद्रांतर्गत जिल्ह्यात एकही काम सुरु नाही. ग्रामीण पेयजलाचे जिल्ह्यात फक्त एक काम चालू असून ग्रामीण स्वच्छता अभियानांतर्गत ४९७ कामे पूर्ण झाली असून १७३ कामे सुरु असल्याचे या विभागाने सांगितले. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याची ६५ कामे पूर्ण झाली असून ३६७ कामे सुरु आहेत.जलसंधारण व जलसंवर्धन विषयक जिल्ह्यात २८८ कामे पूर्ण झाली असून २५८ कामे सुरु आहेत. दुष्काळ प्रतिबंधात्मक ५६ कामे जिल्ह्यात यावर्षात पूर्ण झाली. ३८० कामे सुरु आहेत. जमिनीच्या विकासाकरीता जिल्ह्यात सिंचनाची २ हजार ५०३ कामे पूर्ण झाली असून १२ हजार १४१ कामे चालू आहेत. पारंपारिक जलस्त्रोतांचे नुतनीकरण करण्याची ६ कामे करण्यात आली.जिल्ह्यात दीड लाख खाते बँकेत उघडले४जिल्ह्यात बँक/पोस्टात खाते असलेल्या नोंदणीकृत मजुरांची १ लाख ६२ हजार ६३१ खाते उघडण्यात आले आहेत. वर्षभरात रोहयोच्या कामावर ४७ हजार ६६५ मजुरांनी काम केले असून त्यामध्ये १८ हजार १०२ महिला तर ५२ अपंग मजुरांचा समावेश होता, असेही या संदर्भातील अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प