शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विद्युत रोहित्रातील १ लाखाचे साहित्य चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:00 IST

जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी (परभणी) : जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेवरील वीज रोहित्रातील कॉईल, आॅईल आणि विजेची तार असे सुमारे १ लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री घडली़ या प्रकारामुळे मंगळवारी उशिरापर्यंत जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला होता़येलदरी धरणाच्या खाली पूर्णा नदीपात्रात जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी विद्युत रोहित्र उभारले आहे़ २०० केव्ही क्षमतेचे हे विद्युत रोहित्र आहे़ चोरट्यांनी या रोहित्राचा वीजपुरवठा बंद करून या रोहित्रातील मुख्य कॉईल आणि आॅईल काढून घेतले़ सुमारे १ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे़ या घटनेची माहिती मिळताच कपील फारुखी, नगर अभियंता व्ही़ए़ आडसकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ए़एल़ शेख, बीट जमादार, पांडूरंग तुपसुंदर, बडे, पी़आऱ तिथे आदींनी घटनास्थळी भेट दिली़ ४ मार्च रोजी चोरीच्या घटनेमुळे जिंतूर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे़ मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हा पाणीपुरवठा सुरू होईल, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले़जिंतूर शहराला पाणीपुरवठा करणाºया योजनेवर विद्युत रोहित्र बसविले असून, शहरासाठी येथील वीज मोटार २४ तास सुरू ठेवावी लागते़त्यामुळे दोन आॅपरेटर कायमस्वरुपी कर्तव्यावर असतात, असे असतानाही मुख्य फिडरवरील वीज पुरवठा बंद करून चोरट्यांनी ही चोरी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस