शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वरपूडकरांच्या वारसांना जनतेनं नाकारलं! मुलगा, मुलगी, सून अन् पुतण्या पराभवाच्या छायेत 

By विजय पाटील | Updated: February 9, 2026 12:06 IST

एकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला

परभणी: जिल्ह्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून दबदबा असलेले माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल काळजाचा ठोका चुकवणारे ठरले आहेत. एकाच कुटुंबातील पाच सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून नशीब आजमावत असताना, मतदारांनी घराणेशाहीला कडाडून विरोध करत चार सदस्यांना पराभवाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे.

सत्तेसाठी कुटुंब विखुरले, पण मतदार एकवटले! वरपूडकर कुटुंबातील सदस्यांनी यंदा वेगवेगळ्या राजकीय पक्षांची तिकीटे खिशात घातली होती. भाजपच्या तिकीटावर लढलेले सुपुत्र समशेर वरपूडकर (सिंगणापूर गट), सून प्रेरणा वरपूडकर (दैठणा) आणि पुतण्या उत्कर्ष वरपूडकर (लोहगाव गट) या तिघांवरही पराभवाची गडद छाया आहे. दुसरीकडे, उद्धवसेनेकडून झरी सर्कलमध्ये नशीब आजमावणाऱ्या कन्या सोनल वरपूडकर या दोन हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर असल्याने त्यांचाही पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

अजित वरपूडकरांनी वाचवली 'लाज' एकीकडे कुटुंबातील चार दिग्गज पराभूत होत असताना, काँग्रेसच्या चिन्हावर लोहगाव सर्कलमध्ये लढणारे पुतण्या अजित अनिल वरपूडकर यांनी मात्र वरपूडकर घराण्याची अब्रू राखली आहे. चौथ्या फेरीअखेर त्यांनी हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली असून, ते विजयाच्या दिशेने कूच करत आहेत.

मतदारांनी शिकवला धडाएकाच कुटुंबातील सदस्यांनी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्याकडे ठेवण्याचा केलेला प्रयत्न परभणीच्या सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला असून, हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणणारा ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani ZP Election: Voters Reject Varudkar Family's Political Dynasty Bid.

Web Summary : In Parbhani, voters rejected the Varudkar family's attempt to consolidate power. Four family members from different parties faced defeat. Only Ajit Varudkar of Congress secured a victory, saving the family's reputation. The results signal a significant shift in district politics.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६parabhaniपरभणीZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५