शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी पळविला दुकानातील ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 13:22 IST

 शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली.

परभणी :  शहरातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून दुकानातील मोबाईल, एल.ई.डी. टीव्ही, ए.सी. असा लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. पोलीस ठाण्याला लागूनच असलल्या सुपरमार्केट भागात ही घटना घडल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी, शहरातील लोकमान्यनगरातील रहिवासी हरिपाल मिश्रा यांचे सुपरमार्केट भागात इलेक्ट्रीकल शॉप आहे. मिश्रा यांनी गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान बंद केले. रात्री मिश्रा यांच्या शेजारी असलेल्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि भिंतीला छिद्र पाडून मिश्रा यांच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातील विक्रीला ठेवलेले मोबाईल, एल.ई.डी. टी.व्ही., साऊंड सिस्टीम, दोन ए.सी. आणि १२ ते १४ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तसेच ठसे तज्ञांनीही घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी मिश्रा यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या सुपरमार्केटमध्ये चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :theftचोरीparabhaniपरभणीPoliceपोलिसMobileमोबाइलMarketबाजार