शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: ग्रामीण भागात सलग १२ तास वीजपुरवठा खंडित; सहायक अभियंता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 18:57 IST

सेवाविनियमन २००५ अंतर्गत सहायक अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे.

- मारोती जुंबडे

परभणी: ग्रामीण विभाग क्रमांक २ मध्ये कार्यरत सहायक अभियंता राहुल घोडके यांच्यावर वीजपुरवठ्यातील अक्षम्य दुर्लक्ष आणि वरिष्ठांच्या सूचना न पाळल्याचा आरोप करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई विभागाचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे.

घोडके यांच्या कार्यक्षेत्रातील रहाटी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रहाटी फीडरवर ३० जुलै रोजी रात्री १०.५० वाजल्यापासून तब्बल १२ तास वीजपुरवठा खंडित राहिला. यामुळे समसापुर, पिंपरी (दे.), टाकळी (कु.), रहाटी आणि पिंगळी या गावांमध्ये संपूर्ण अंधार झाले. मात्र, संबंधित अभियंत्याने ना वीजपुरवठा खंडित होण्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, ना त्यांना दूरध्वनीवर प्रतिसाद दिला, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कारणास्तव वीजग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला तर कंपनीच्या कार्यक्षमतेविषयी नकारात्मक संदेशही पसरला. या दुर्लक्षमुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचल्याचे निर्देशांत नमूद आहे. सेवाविनियमन २००५ अंतर्गत राहुल घोडके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे.

वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश वाघमारेही निलंबितयाचप्रमाणे, महावितरणच्या परभणी ग्रामीण शाखा क्रमांक २ मध्ये कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांनाही सेवा शिस्तभंग, जबाबदारीतील हलगर्जीपणा आणि वरिष्ठांचे निर्देश न पाळल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई उपकार्यकारी अभियंता महावितरण ग्रामीण उपविभाग गजेंद्र गादेकर यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. ३३ के.व्ही. उपकेंद्र रहाटी अंतर्गत असलेल्या रहाटी फीडरवर वीजपुरवठा तब्बल १२ तास खंडित राहिला, ज्यामुळे संबंधित गावांत संपूर्ण अंधाराचे वातावरण निर्माण झाले होते. तरीही वाघमारे यांनी ना ब्रेकडाऊनची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, ना दुरुस्तीचा तत्काळ प्रयत्न केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीelectricityवीजsuspensionनिलंबन