शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

Parabhani: पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:30 IST

Parabhani News तक्रारदाराकडून आरोपीने १० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

परभणी : कंपाऊंड वॉल आणि नाली बांधकामाच्या एमबीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत अंगणवाडी परिसरातील कंपाउंड वॉल आणि नाली बांधकाम ४२ वर्षीय तक्रारदार यांनी पूर्ण केले होते. त्याचे मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी त्यांनी पंचायत समिती येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, शाखा अभियंता अण्णासाहेब किसनराव तोडे यांनी एमबी लिहिण्यासाठी १० हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने ४ मार्च रोजी एसीबीकडे केली होती.

१८ मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी अण्णासाहेब तोडे यांनी एमबी लिहून तक्रारदाराच्या ताब्यात दिले व सांगितले की, कामाच्या रकमेचा भरणा झाल्यानंतर १० हजार द्यावे लागतील. त्यामुळे एसीबीने त्यांच्यावर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. २४ मार्च रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात संबंधित कामाच्या रकमेचा भरणा झाल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून आरोपीने १० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर अण्णासाहेब तोडे यांच्याविरूद्ध नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांचा मोबाइल ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.

तोडे यांच्या घराची घेतली झडतीसापळा कारवाईनंतर तोडे यांच्या अंगझडतीत १० हजार रुपये लाच, १ हजार ३३० रुपये रोख आणि १ मोबाइल फोन जप्त करण्यात आला. तसेच, त्यांच्या परभणी येथील यशोधन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली असता ५८ हजार ५०० रुपये रोख आणि अंदाजे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर, एएसआय निलपत्रेवार, पोह अनिरुद्ध कुलकर्णी, सीमा चाटे, पो. अंमलदार अतुल कदम, नामदेव आदमे, जे. जे. कदम, ईश्वर जाधव, शाम गोरपल्ले यांचा समावेश होता.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग