शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'बायको भावपूर्ण श्रद्धांजली' स्टेटस ठेवलं; माहेरी गेलेल्या पत्नीचा पाठलाग करून पतीने केला खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:03 IST

जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील घटना

जिंतूर (जि.परभणी) : किरकोळ कारणावरून बायको माहेरी गेल्याने राग आलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी बायको भावपूर्ण श्रद्धांजली, असे व्हाॅट्सॲप स्टेटस ठेवले. त्यानंतर दोन दिवसांपासून पाठलाग करून माहेरी गेलेल्या पत्नीचा संधी साधत चाकूने भोसकून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथे गुरुवारी घडली.

तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या डिगांबर जाधव हिचे लग्न अंदाजे नऊ वर्षांपूर्वी वाघी येथील विजय रामा राठोड याच्यासोबत झाले होते. या दोघांना दोन मुले आहे. आठ दिवसांपूर्वी या दोघांत घरगुती वाद झाल्याने तिचा भाऊ राहुल जाधव याने विद्या राठोड हिला काही दिवसांसाठी माहेरी आणले. हा राग मनात धरून संबंधिताने खून करण्यापूर्वी व्हाॅट्सॲपवर स्टेटस ठेवले. बायको भावपूर्ण श्रद्धांजली, असे त्यावर लिहिले होते.

पाठलाग करून केला हल्लादरम्यान, विद्या राठोड हिचा चुलता विठ्ठल प्रताप जाधव याचा पाय मोडल्याने त्यांना पाहण्यासाठी विद्या राठोड या गावाशेजारील शेत आखाड्यावर जाते, म्हणून गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर पडली. यावेळी तिच्या पाळतीवर असलेला तिचा पती विजय रामा राठोड याने हेरून तीक्ष्ण हत्याराने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तिचा खून केला व तिचा मृतदेह शेतातच ठेवून तो पळून गेला.

शेतात आढळला मृतदेहविद्या राठोड या बराच वेळ झाला तरी परतल्या नाही, म्हणून कुटुंबीय काळजीत असतानाच त्यांना विद्या राठोड या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता विद्या राठोड निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी