शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: रेणाखळी-वरखेड शिवारात बिबट्याचा वावर कायम; दोन जनावरांचा फडशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:50 IST

वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्याचे नियोजन

- विठ्ठल भिसे पाथरी : तालुक्यातील रेणाखळी शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची घटना समोर आल्यानंतर, दोन जनावरांचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले  आहे. रेनाखळी सोबत बिबट्या आता वरखेड शिवारात दिसून आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, पाऊलखुणांच्या आधारे हा बिबट्याच असल्याचा दुजारा दिला आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्याच्या दिशेनेही विभागाने तयारी सुरू केली आहे.

या घटनेमुळे रेणाखळी तसेच वरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी रात्री बाहेर जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित स्थळी बांधावीत व शेतशिवारात उजेडाची सोय करावी असा सल्ला वन विभागाकडून देण्यात आला आहे. ग्रामीणांमध्ये या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रेनाखळी येथील  संदिपान अंबादास श्रावणे  आणि  प्रमोद भास्करराव हरकळ मध्ये आखाडा वरील शेत गट नंबर ३१४/३६५मधील जनावरे ठार झाली आहेत

रेनाखळी येथे 27 नोव्हेंबर रोजी एका जनावरावर हल्ला झाल्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी एच एन जाधवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश जाधव यांनीजाय मुक्यावर जाऊन घटनास्थळी ची पाहणी करून पंचनामा नोंदवला सोबत वन मजूर जनार्दन राठोड पांडू वाघ हे होते त्या नंतर 30 नोव्हेंबर रोजी रेनाखळी येथे दुसऱया जनावरावर हल्ला केला , दोन्ही जनावरे हल्ल्यात दगावली आहेत तातडीने पायाचे ठसे तपासण्या आल्या नंतर बिबटयाचा हल्ला असल्याचे वन विभागाने दुजोरा दिला आहे, आता वन विभाग कडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहेत त्या नंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वनरक्षक अंकुश  जाधव यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard terrorizes Parbhani, kills livestock; villagers fear for safety.

Web Summary : A leopard is on the prowl in Renakhali and Varkhed, Parbhani, killing two animals. Forest department investigates, plans trap cameras, and advises villagers to stay vigilant and protect their livestock. Fear grips the region.
टॅग्स :leopardबिबट्याparabhaniपरभणी