शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Parabhani: सिलिंडर लिकेजमुळे स्वयंपाकघरात आगीचे लोट, अग्निशमन जवानांमुळे अनर्थ टळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 16:12 IST

जीवाची बाजी लावून आग विझवणाऱ्या जवानांचे नागरिकांकडून कौतुक; कुटुंबाचा जीव वाचला

- विठ्ठल भिसेपाथरी (परभणी): पाथरी शहरात गुरुवारी (दि. ६ डिसेंबर) दुपारी १२.४२ वाजता पाटील गल्ली परिसरात गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. निखिल पाटील यांच्या घरी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस बाहेर पडू लागला आणि क्षणार्धात संपूर्ण स्वयंपाकघर आगीच्या ज्वालांनी वेढले. मात्र, अग्निशमन दलाच्या दोन जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी कामगिरीमुळे मोठी जीवितहानी टळली.

स्वयंपाकघरात आग आणि धुराचे लोटदुपारच्या वेळी स्वयंपाकाचे काम सुरू असताना निखिल पाटील यांच्या घरी हा प्रकार घडला. अचानक गॅस लिकेज होऊन आग इतकी भडकली की काही क्षणांतच स्वयंपाकघर धूर आणि आगीच्या लोटांनी भरून गेले. सिलिंडरमधील लिकेजमुळे आग स्फोटक स्वरूपात भडकली. यामुळे घरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती.

बुलेट गाडीवर धावले, जीवाची पर्वा केली नाही!घटनेची माहिती मिळताच, पाथरी अग्निशामक दलाचे जवान खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी तत्काळ अग्निशमन बुलेट गाडीवरून घटनास्थळी धाव घेतली. आग इतकी भीषण होती की ती क्षणात संपूर्ण घराला आपल्या विळख्यात घेऊ शकली असती. मात्र, खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांनी जराही विलंब न लावता, आपल्या जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.

मोठी दुर्घटना टळलीत्यांच्या वेळेवर आणि धाडसी हस्तक्षेपामुळे कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित राहिले. या भीषण आगीत घरातील वस्तू आणि साहित्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खुर्रम खान आणि बळीराम गवळे यांच्या या धाडसी कार्याचे शहरातून नागरिक, स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: Gas Leak Sparks Kitchen Fire; Firefighters Avert Disaster

Web Summary : A gas leak in Parbhani caused a kitchen fire, but firefighters bravely contained it, preventing major damage and potential casualties. Their swift action saved lives.
टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी