शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

परभणीत घरकुल उद्दिष्टपूर्तीला पंचायत समितीचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 19:32 IST

 सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ठळक मुद्देपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात२०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

परभणी :  सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना लागू झाली. मात्र परभणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उद्दीष्टपूर्तीलाच खो दिल्याने दोन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने घरकुल योजना राबविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ पासून इंदिरा गांधी आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजनेत केले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते. प्रत्येक घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १ लाख २० हजार  रुपये, नरेगा अंतर्गत १९ हजार रुपये आणि १२ हजार रुपयांचे अनुदान स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिले जाते. एका घरकुलासाठी तिन्ही विभागामार्फत दीड लाख रुपयांचे अनुदान चार हप्त्यात वर्गीकरण करुन दिले जाते.  परभणी पंचायत समितीला दोन वर्षापासून दिलेले उद्दिष्टच पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हक्काच्या घरापासून वंचित राहिल्याचे दिसून येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये परभणी पंचायत समितीला ४०५ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार तालुक्यातील ११७ ग्रामपंचायतीतील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये सभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. निवडलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले. परंतु, पंचायत समितीतील कामचुकार अधिकाऱ्यांमुळे ४०५ घरांच्या उद्दिष्टापैकी केवळ २३५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २०१६-१७ या वर्षातील १७० घरकुले अजूनही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परभणी पंचायत समिती प्रशासनाला १७३ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. अद्यापपर्यंत एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. १७३ घरांपैकी केवळ ९८ लाभार्थ्यांना घरकाम करण्यासाठी पहिला हप्ता वर्ग झाला आहे. त्यामुळे २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील ३४३ घरकुले अजूनही पूर्णत्वास गेली नाहीत.

दोन वर्षांपासून परभणी पंचायत समिती अंतर्गत घरकुलाचे उद्दीष्ट पूर्ण होत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी नव्यानेच पदभार घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीला आलेली मरगळ दूर होऊन लाभार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होते का, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

११०० पैकी ३२ घरेच पूर्णप्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी जिल्ह्याला १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२ घरेच पूर्ण झाली आहेत. ६५२ लाभार्थ्याला केवळ पहिला हप्ता वर्ग करण्यात आला आहे. ७५ लाभार्थ्याला दुसरा, २१ लाभार्थ्यांना तिसरा तर दोन लाभार्थ्यांंना चौथ्या हप्त्याची रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला देण्यात आलेले १ हजार ९६ घरांचे उद्दिष्ट २०१७-१८ या आर्थिक वर्षात पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु, अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेचा फटका या योजनेला बसला आहे. त्यामुळे गरजवंत लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वंचित रहात आहेत. 

यावर्षीच्या उद्दिष्टासाठी हालचालीपरभणी पंचायत समितीअंतर्गत ११७ गावे येतात. या गावातील लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वत:चे घर मिळावे, यासाठी शासनाकडे उद्दिष्ट पाठविले जाते. त्यानुसार पंचायत समिती प्रशासनाकडून २०१८-१९ या वर्षातील उद्दिष्टासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.मात्र गेल्या दोन वर्षातील ३४३ घरे अजूनही अपूर्ण आहेत. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून दूर जात आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या योजनेतील उद्दिष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारHomeघरparabhaniपरभणी