शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहराचा बाह्य वळण रस्ता : ८५ कोटींचा प्रस्ताव निधीअभावी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:03 IST

राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीय महामार्गाच्या बाह्य वळण रस्त्यासाठी ८५ कोटींचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया रखडली आहे.कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढला जात आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी परभणी, धर्मापुरी, वांगी, असोला, पारवा या पाच गावांच्या शिवारातील जमिनींचे संपादन केले जाणार आहे.जमिनीची मोजणी, शेतकरीनिहाय क्षेत्र आदीबाबी पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाने प्रत्येक शेतकऱ्यांची सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली आहेत. जमिनीच्या मूल्यमापनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.१४.५ कि.मी. अंतराचा हा बाह्यवळण रस्ता असून या रस्त्यासाठी जमीन संपादन करणे आवश्यक आहे. मूल्यमापनाअंती भूसंपादन विभागाने ८५ कोटी रुपयांची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. दीड महिन्यापूर्वी हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आला. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.भूसंपादन विभागास निधी प्राप्त झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रियाच रखडली आहे. पर्यायाने बाह्यवळण रस्त्याच्या कामासही विलंब लागत आहे.तीन वर्षांपासून काम ठप्पबाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जमिनीची मोजणी, त्याचे मूल्यमापन या बाबी पूर्ण झाल्या असून ही जमीन केंद्र शासनाच्या ताब्यात आल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीला परभणी जिल्ह्यामध्ये मानवतपर्यंत आणि झिरोफाट्यापासून पुढे राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने होत आहे. मात्र बाह्यवळण रस्त्याच्या कामालाच विलंब लागत आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन बाह्यवळण रस्त्याचे कामही सुरु करावे, अशी मागणी होत आहे....तर शहरातील वाहतूक होईल सुरळीतबाह्यवळण रस्ता पूर्ण झाल्यानंतर शहरातून धावणारी जड वाहने बाह्यवळण रस्त्याने धावतील. परिणामी शहरातून जाणाºया वसमत रस्त्यावरचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग