दरवर्षी २१ जून हा जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला जातो. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने ऑनलाइन योग वर्गासह योगासन, निबंध, चित्रकला, घोषवाक्य, गीता अध्याय पठण आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शिवाजीनगर येथील योगसाधना केंद्रात ४ जून रोजी सुभाष जावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत स्पर्धेचे नियोजन करण्यात आले. बैठकीस डॉ. दीपक महिंद्रकर, भास्करराव ब्रम्हनाथकर, डॉ.रवी भंडारी, रामविलास लड्डा, आशिष लोया, सुहास सातोनकर, नरेंद्र कदम, प्रशांत जोशी, श्रीपाद कुलकर्णी, मोहन गांधर्व, आरती शिंदे, हर्षदा अंभोरे, गीतांजली मानवते, वैशाखी काकडे, चंचल निकम, विद्या मालेवार आदींची उपस्थिती होती. विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे. ११ हजार रुपयांची बक्षिसे या स्पर्धेसाठी निश्चित केली असल्याची माहिती जागतिक योग दिन उत्सव समितीने दिली.
ऑनलाइन योग वर्ग, स्पर्धांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:14 IST