शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डीएनए तपासणीनंतरच गीताच्या कुटुंबीयांचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 01:42 IST

आपलीच मुलगी असल्याचा वाघमारे कुटुंबीयांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : २० वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेलेल्या मूकबधिर गीताच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असून, याच दरम्यान जिंतूर येथील मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात डीएनए चाचणी झाल्यानंतरच तिच्या कुटुंबीयांचे सत्य पुढे येईल. त्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाच्या परवानगीनुसार पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती येथील पहल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आली. 

रेल्वेने प्रवास करीत असताना १९९८ मध्ये गीता पाकिस्तानात गेली होती. त्यावेळी ती ६ वर्षांची होती. त्यानंतर भारत सरकारने गीताला भारतात आणले असून, तिच्या कुटुंबीयांचा सध्या शोध सुरू आहे. गीताने आपल्या गावाची ओळख सांगताना घराच्या आसपास रेल्वे स्टेशन, नदी आणि उसाची शेती असल्याचे सांगितले. त्यामुळे डिसेंबर २० मध्ये परभणी जिल्ह्यातील  गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर येथे काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली. त्यावेळी जिंतूर येथील परंतु सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असणाऱ्या मीना वाघमारे यांनी गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे मीना, त्यांची बहीण पूजा बनसोडे आणि गीता यांची जिंतूर येथे भेट घालून देण्यात आली. गीताच्या पोटावर जळाल्याची खून असल्याचे या कुटुंबीयांतील वृद्धेने सांगितले. त्यानुसार पाहणी केली असता गीताच्या पोटावर तशी खूण आढळली आहे. परंतु, मीना वाघमारे यांनी त्यांची मुलगी हरवल्यासंदर्भात कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली नाही किंवा काही जुनी कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे गीताच्या कुटुंबीयांची ओळख पटविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातून डीएनए तपासणीची परवानगी घेतली जाणार आहे. त्यानंतरच पुढील प्रक्रिया केली जाईल, असे पहल फाऊंडेशनचे अशोक सेलगावकर यांनी सांगितले.

गीता सध्या काय करतेय...मूकबधिर गीताला आत्मनिर्भर करण्यासाठी पहल फाऊंडेशनचे अनिकेत सेलगावकर हे सांकेतिक भाषा शिकवित आहेत. किमान आठवीपर्यंतचे शिक्षण देऊन तिला नोकरी करता यावी व ती स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभी राहावी, यासाठी गीताला शिक्षण दिले जात आहे.

टॅग्स :Parbhani spपोलीस अधीक्षक, परभणीPakistanपाकिस्तान