शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परभणी जिल्यातील प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 6:10 PM

मुख्य प्रकल्पांसह मध्यम व  लघु प्रकल्पात एकूण २२३़८८२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देजिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातून परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा या दोन मोठ्या शहरांनाही पाणीपुरवठा होतो़तसेच जिंतूर तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामीण गावांच्या पाणीपुरवठाची भिस्तही याच प्रकल्पावर अवलंबून आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही़ त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़

परभणी : जिल्ह्यातील मुख्य प्रकल्पांसह मध्यम व  लघु प्रकल्पात एकूण २२३़८८२ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे जिल्ह्यात आगामी काळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ 

परभणी जिल्ह्यात येलदरी आणि निम्न दूधना हे दोन मुख्य प्रकल्प असून, गोदावरी नदीवर बांधलेले चार बंधारे, दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांतून जिल्ह्यातील विविध गावांना आणि शहरांना पाणीपुरवठा केला जातो़ मागील वर्षी सरासरीपेक्षा ३१ टक्के पाऊस कमी झाल्याने यावर्षीच्या प्रकल्पातील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला आहे़ सध्या नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उपलब्ध असलेले २८ टक्के पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे़ 

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पातून परभणी शहरासह जिंतूर, पूर्णा या दोन मोठ्या शहरांनाही पाणीपुरवठा होतो़ तसेच जिंतूर तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामीण गावांच्या पाणीपुरवठाची भिस्तही याच प्रकल्पावर अवलंबून आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नाही़ त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ ९३४ दलघमी क्षमता असलेल्या येलदरी प्रकल्पात ८०९़७७० दलघमी जीवंत पाणीसाठ्याची क्षमता आहे़ जीवंत पाणीसाठ्यातूनच पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते़ सध्या या प्रकल्पात केवळ ३८़५२५ दलघमी एवढाच जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे़ ४़७६ टक्के पाणी प्रकल्पात उपलब्ध असल्याने अनेक गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून १२०८़९८७ दलघमी पाणी साठवण्याची क्षमता आहे़ मात्र प्रत्यक्षात केवळ २२३़८८२ दलघमी म्हणजे २७़५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ उन्हाळ्याला आणखी सुरुवातही झालेली नाही़ काही गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे़ तर काही गावांत आतापासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे़ 

जिल्हा प्रशासनाने जून अखेरपर्यंतचे टंचाई कृती आराखडे तयार केले आहेत़ पाणीटंचाई निर्माण झाल्यास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचीही आखणी केली आहे़ प्रकल्पांमध्ये शहरी व ग्रामीण भागासाठी पाण्याचे आरक्षणही करण्यात आले आहे़ जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पाण्यातून नियोजन केले असले तरी आगामी काळात पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे प्रशासनाला आतापासूनच सतर्क रहावे लागणार आहे़ 

प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठायेलदरी प्रकल्पात ३८़५२५ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ तर सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पात १३२़०८१ दलघमी, झरी प्रकल्पात ०़६२२ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात ८़६७५ दलघमी, मासोळी प्रकल्पात १़९९१ दलघमी, डिग्रस उच्च पातळी बंधार्‍यात २९़४८० दलघमी, मुदगल बंधार्‍यात ६़०१० दलघमी, ढालेगाव बंधार्‍यात ५़८८० दलघमी तर पिंपळदरी तलावामध्ये ०़६१८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे़ गंगाखेड तालुक्यातील मुळीचा बंधारा मात्र पूर्णत: कोरडाठाक पडला आहे़ 

‘निम्न दुधना’तून घेतले पाणीपरभणी आणि पूर्णा या दोन शहरांना येलदरी प्रकल्पातून पाणी घेतले जाते़ दरवर्षी टंचाईच्या काळात याच प्रकल्पात दोन्ही शहरांसाठी पाण्याचे आरक्षण केले जाते़ मात्र यंदा येलदरी प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने निम्न दूधना प्रकल्पात या शहरांसाठी ३० दलघमी पाणीसाठा आरक्षित केला आहे़ त्यातून परभणी शहराला एक पाणी पाळी यापूर्वीच घेण्यात आली आहे़ दूधना प्रकल्पामध्ये ५४़५३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने परभणी शहरवासियांच्या चिंता कमी झाल्या आहेत़

जिल्ह्यातील भूजल पातळी स्थिरयेथील भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील भूजल पातळीचे निरीक्षण नोंदविले आहे़ मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी एकाही तालुक्यात पाणी पातळीत घट झालेली नाही़ त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील भूजल  पातळी समाधानकारक असून, पूर्णा तालुक्यात २़३४ मीटर आणि पाथरी तालुक्यात २़९४ मीटरवर भूजल पातळी गेली आहे़ 

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणीparabhaniपरभणी