शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पालम तालुक्यात विमा कंपनीने नाकारले पीक विम्याचे एक हजार प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 19:33 IST

खरीप हंगामातील पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल केलेले तालुक्यातील तब्बल १ हजार प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत. त्यामुळे विम्याच्या रक्कमेपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

पालम (परभणी ): खरीप हंगामातील पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दाखल केलेले तालुक्यातील तब्बल १ हजार प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत. त्यामुळे विम्याच्या रक्कमेपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.यावर्षी खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, मूग, तूर आदी पिकांची लागवड केली; परंतु, आपल्या पिकांना संरक्षण देण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पालम तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रात्री उशिरापर्यंत रांगा लावत जुलै २०१७ मध्ये  पिकांचा विमा हप्ता भरला आहे. आॅनलाईन पद्धतीने विमा हप्ता भरताना पालम तालुक्यामध्ये अखेरीस शेवटच्या दोन- चार दिवसांत मोठा गोंधळ उडाला. 

शेतकर्‍यांनी याबाबत आंदोलनेही केली. त्यानंतर राज्य शासनाने दोन दिवसात चार अध्यादेश काढून आॅफलाईनने अर्ज घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी आपले पीक संरक्षित केले नाही, त्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आॅफ लाईनने प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यातील पालम तालुक्यातील १ हजार प्रस्ताव अद्यापही बँकांमध्ये धूळखात पडून आहेत. पीक विम्याची जबाबदारी असलेल्या रिलायन्स विमा कंपनीने हे प्रस्ताव स्वीकारले नसल्याने ते बँकेतच पडून आहेत. या विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे १ हजार शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅफलाईनने प्रस्ताव दाखल केलेल्या शेतकर्‍यांचे प्रस्ताव ग्राह्य धरण्यात यावेत, अशी मागणी लाभार्थी शेतकर्‍यांकडून होत आहे. 

असे दाखल झाले आहेत अर्जराज्य शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आॅफलाईनने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर पालम तालुक्यातील शेतकर्‍यांनी तब्बल १ हजार ६७ प्रस्ताव दाखल केले आहेत. यामध्ये पालम ७००, पेठशिवणी २८३, रावराजूर २०, चाटोरी ६४ या गावातील अर्जांचा समावेश आहे. परंतु, या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. तसेच रिलायन्स विमा कंपनीने आॅफ लाईनने दिलेले अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांपासून हे अर्ज बँकेतच धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या प्रकरणी शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लक्ष देऊन विमा कंपनीने नाकारलेले प्रस्ताव ग्राह्य धरण्यात यावेत, असे आदेश निर्गमित करावेत, अशी मागणी लाभार्थी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. 

तहसीलदारांना निवेदनरिलायन्स विमा कंपनीने नाकारलेल्या प्रस्तावांवर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे, भगवान करंजे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पिकांची आणेवारी  जाहीर केली आहे. यामध्ये पालम तालुक्याची ५० पैशापेक्षा कमी आणेवारी  जाहीर झाली आहे. त्यामुळे विमा कंपनीने प्रस्ताव न स्वीकारल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. 

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी