वडगाव सुक्रे येथील विश्वंभर विठ्ठलराव सुक्रे व केशव विठ्ठलराव भोसले हे दोघे १३ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास शिर्शी बु. येथून नातेवाइकांकडून गावाकडे पायी येत होते. गावाच्या रस्त्यावरील एका आखाड्याजवळ ब्रह्मपुरीकडून येणाऱ्या एमएच २२ एटी ६१९३ क्रमांकाच्या दुचाकीने केशव भोसले याला जोराची धडक दिली. यात केशव गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. दरम्यानच्या काळात धडक देणारा दुचाकीस्वार पळून गेला. याबाबत विश्वंभर सुक्रे यांनी दैठणा पोलीस ठाण्यात १४ एप्रिल रोजी फिर्याद दिली. त्यावरून निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एमएच २२ एटी ६१९३ क्रमांकाच्या दुुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST