शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना 'एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह'; शेतकरी बापाचे दुःख पाहून मुलीचा थेट फोन, काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:35 IST

शेतकरी कन्येने थेट मुख्यमंत्र्यांना साधला संपर्क; ४८ तासांत 'मेकॅनिकल चमत्काराने' सोलार पंप सुरू!

मानवत (जि. परभणी) : एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह, असा एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, असा अनुभव तालुक्यातील रामपुरी येथील इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या दुर्गा केशव नाईक हिला शुक्रवारी (५ डिसेंबर) आला. शासनाच्या ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेंतर्गत जून महिन्यात मानवत तालुक्यातील केशव गंगाधर नाईक या शेतकऱ्याने शेतात कृषीपंप बसवला. तीन-चार दिवसांतच नैसर्गिक आपत्तीने सोलार पॅनल पूर्ण कोसळला. शेतकऱ्याने या घटनेची तक्रार संबंधित विभागाकडे केली. मात्र, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर या शेतकऱ्याच्या कन्येने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील ४८ तासांत शेतकऱ्याच्या शेतातील सोलार पॅनल दुरुस्त करून बसवण्यात आला.

एका महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप बसवण्यात आल्यामुळे राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या नोंदीचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केला होता. यावेळी केशव नाईक यांची मुलगी दुर्गा हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतातील घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दुर्गा हिच्या फोनची तत्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आदेश दिले. पुढील ४८ तासांत संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील सोलार पॅनल दुरुस्त करून देण्यात आला. यानंतर बोअर सुरू झाला. गाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्याच्या लेकीच्या तक्रारीची दखल घेतल्याने कुतूहल व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलीमाझे वडील अनेक महिन्यांपासून सोलार पंप दुरुस्तीसाठी कंपनीकडे वारंवार तक्रार करीत होते. त्यांच्या तक्रारीची दखल कंपनी घेत नव्हती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावरून मी मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात फोन केला. त्यांनी माझी व्यथा एकूण ४८ तासांच्या आत सोलार पंप दुरुस्त केला. मुख्यमंत्र्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलीची दखल घेतल्याने समाधान आणि आनंद आहे.- दुर्गा नाईक, शेतकरी कन्या

English
हिंदी सारांश
Web Title : CM's One Call Solves Farmer's Solar Pump Issue Instantly

Web Summary : A farmer's daughter's call to the CM fixed her father's solar pump within 48 hours. The farmer had been struggling with a broken solar panel under a government scheme. Impressed by the quick action, villagers lauded the CM's responsiveness to the farmer's plight.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र