शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

By मारोती जुंबडे | Updated: June 19, 2025 17:45 IST

जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत.

परभणीश्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात परभणी येथील वैद्यकीय दांपत्याने ११ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा मुख्य गाभाऱ्यास अर्पण केला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्यास अर्पण करण्यात आलेल्या नव्या दरवाज्यामुळे भक्तांसाठी भावनिक आणि आध्यात्मिक क्षण अनुभवता आला.

आळंदीत डॉ. मसलेकर यांनी सेवेकऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले होते. परभणीतून विविध औषधे, तपासणी साहित्य आणून एकूण २२० सेवेकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सेवाकार्यातून मिळालेल्या अध्यात्मिक अनुभूतीतून गाभाऱ्यास काहीतरी अर्पण करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून दरवाजा अर्पण करण्याचा संकल्प रुजला. जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत.

दरवाजा तयार करण्यासाठी डॉ. मसलेकर दांपत्याने स्वतः वेळ देत चार महिन्यांत हे कार्य पूर्ण केले. हा दरवाजा आळंदीच्या मंदिरात वारीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने बसविण्यात आला. माऊली वारीच्या प्रस्थानपूर्व दिवशी ही अर्पणक्रिया पार पडली. मंदिर ट्रस्टचे योगी निरंजनदास महाराज आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते मसलेकर दांपत्याचा सन्मानही करण्यात आला.

सेवाभावी वृत्तीने आरोग्य शिबिर घेत असताना सेवेकऱ्यांच्या निःस्वार्थ भावनेने भारावून गेलो. गाभाऱ्यात उभा राहताना एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच हा दरवाजा अर्पण करण्याचा संकल्प केला.- डॉ. श्रीराम मसलेकर

वैद्यकीय व्यवसायात असतानाही समाजासाठी काहीतरी भक्तिभावाने करावे, ही आमची सदैव इच्छा होती. हा दरवाजा म्हणजे आमच्या श्रद्धेचे आणि समाजसेवेच्या भावनेचे प्रतीक आहे.- डॉ. पद्मजा मसलेकर

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५parabhaniपरभणी