शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विभागात शेतकऱ्याची अडवणूक, पर्यवेक्षकाने स्वीकारली ३ हजारांची लाच

By मारोती जुंबडे | Updated: March 12, 2024 17:11 IST

मी तुमचे मोठे काम केल्याचे सांगून स्वीकारली ३ हजारांची लाच

परभणी: शासनाच्या योजनेतून खरेदी केलेल्या रोटावेटरची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी गंगाखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षकाने तक्रारदाराकडून मी तुमचे मोठे काम केल्याचे सांगून ३ हजारांची लाच स्वीकारल्याचे १२ मार्च रोजी समोर आले. याप्रकरणी एसीबीकडून पर्यवेक्षकासह ताब्यात घेण्यात आले.

तक्रारदाराच्या पुतण्याची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रोटावेटरसाठी ऑनलाईन सोडतीमध्ये निवड झाली. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी गंगाखेड यांच्याकडून लाभार्थ्यास रोटावेटर खरेदीसाठी पूर्वसंमती पत्र देण्यात आले.  तक्राराच्या पुतण्याने रोटावेटरची खरेदी केली. परंतु, या रोटावेटरची पाहणी करून फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी पर्यवेक्षकाने २१ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्या गावी भेट देऊन खरेदी केलेल्या रोटावेटरचे फोटो काढले.  मी तुमचे मोठे काम केले आहे. यापूर्वी पण तुमच्या भावाला अनुदानावर मिळालेल्या ट्रॅक्टरचे फोटो काढून वेबसाईटवर अपलोड केले आहेत. तेव्हा तुम्ही मला येऊन भेटा, असे सांगितले. त्यानंतर ३ हजार रुपये लाचेची मागणी केली.

तक्रारदाराने एसीबी कार्यालयात धाव घेऊन आपली तक्रार नोंदवली. ५ मार्च रोजी एसीबी कार्यालयाकडून पंचासमक्ष लाचेची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर १२ मार्च रोजी एसीबी कार्यालयाकडून सापळा रचण्यात आला. यामध्ये पर्यवेक्षक मोहन देशमुख यांनी पंचासमक्ष ३ हजारांची लाच स्व:ता स्वीकारली. त्यानंतर तातडीने एसीबी पथकाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

शासकीय योजनेतही लूट सुरूचकेंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, दुसरीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून यातही शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचे वारंवार समोर आले. त्यातच शासकीय योजनेतील लाभाच्या वस्तूंचे फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी आणि अनुदानाची रक्कम बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी काही जणांकडून लाचेची मागणी केली जात आहे. त्यातच एसीबी कार्यालयाकडून मंगळवारी केलेल्या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागFarmerशेतकरीparabhaniपरभणी