मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात चाचण्या होत असल्या तरी बाधित रुग्णांची संख्या मात्र मर्यादित आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी आरोग्य विभागाला ४५० नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात केवळ एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दुसरीकडे १४ जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ५१ हजार ५५८ झाली असून, ४९ हजार ८०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २८५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या ७० रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी परभणी शहरातील संत दासगणू नगर येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.