शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

परभणीकरांसाठी पुढील तीन दिवस तापदायकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:58 PM

मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यातील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, वाढत्या उन्हामुळे नागरिकांना आगामी तीन दिवस तापदायक ठरणार आहे़परभणी जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्यापासून तापमान वाढले आहे़ सलग तीन महिने काही दिवसांचा अपवाद वगळता परभणी जिल्ह्याचा पारा ४० अंशापेक्षा अधिक राहिला आहे़ त्यामुळे नागरिक उन्हाने त्रस्त झाले आहेत़ मे महिन्यातच पावसाची प्रतीक्षा लागली असतानाच भारतीय हवामान खात्याने परभणी जिल्ह्यात २८ मेपर्यंत उष्णतेची लाट येऊन तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे़ त्यामुळे जिल्हावासियांना पुढील आठवड्यातही वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे़ यावर्षी जिल्ह्यात विक्रमी ४७़३ अंश तापमानाची नोंद झाली आहे़ जिल्ह्याच्या ३० वर्षांच्या इतिहासातील हे सर्वाधिक तापमान ठरले़ त्यानंतर हळूहळू तापमान कमी होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र ती फोल ठरली़ सरत्या आठवड्यातही जिल्ह्याचा पारा ४३ ते ४४ अंशा दरम्यान राहिला़ रविवारी परभणी जिल्ह्यात ४४़२ अंश तापमानाची नोंद झाली आहे़ त्यातच हवामान खात्याने आणखी तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली़ त्यामुळे येत्या काळातही नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे़ रविवारी सकाळपासूनच तापमानात मोठी वाढ झाली होती़ कडक उन्हामुळे रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला़जिल्हा प्रशासनाचे आवाहन४हवामान खात्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़४शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे, सुती कपडे वापरावेत, उष्ण पेय घेऊ नये, भरपूर पाणी प्यावे, शरिरातील क्षारांची कमी भरून काढण्यासाठी लिंबू पाणी आणि मिठ घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले केले आहे़कृषी विद्यापीठाचा अंदाजवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवेनेही आगामी काळात तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली आहे़ २७, २८ आणि २९ असे तीनही दिवस कमाल तापमान ४४ अंशापर्यंत तर किमान तापमान २९ अंशापर्यत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTemperatureतापमान