शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ येथे महावितरणविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:15 IST

करम येथील महावितरण उपकेंद्राच्या गलथान कारभारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

सोनपेठ (परभणी ) : तालुक्यातील करम येथील महावितरण उपकेंद्राच्या गलथान कारभारविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.

महावितरणने करम येथील शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. शेतातील कृषी पंप व घरगुती वापरासाठी देखील व्यवस्थित वीज पुरवठा सुरळीत नाही. यामुळे या फिडर अंतर्गत असलेल्या वडगाव, वैतागवाडी, निळा, वंदन, मरगळवाडी, बनवडी, वैतागवाडी तांडा, उंदरवाडी तांडा, करम, उक्कडगाव, उखळी, पारधवाडी, नैकोटा, भुक्तरवाडी, कारबेटवाडी, लोकरवाडी, नखतवाडी आदी गावांतील ग्रामस्थ त्रस्त आहेत.  

याविरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महावितरणाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, लोबंकळणा-या, जीर्ण झालेल्या तारा, वाकलेले खांब तसेच फ्यूज दुरुस्त करण्यात यावेत. वैतागवाडी तांडा व उंदरवाडी तांडा येथे सिंगल फेज चा वीज पुरवठा देण्यात यावा. फिडरवरील गंगाखेड तालुक्यातील 6 गावांचा पुरवठा बंद करावा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार जिवराज डापकर, महावितरणचे अभियंता कांबळे यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर,  दशरथ सुर्यवंशी तालुका प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस, विठ्ठलराव सुर्यवंशी, रामभाऊ बेद्रे, विष्णूपंत धोंडगे, श्रीकांत मोरे, राजेभाऊ जाधव यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेस