शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादीचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 12:09 IST

तिरंगी लढत । वंचित बहुजन आघाडीची एंट्री दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी

परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी काँग्रेसने कडवे आव्हान दिले असून, वंचित बहुजन आघाडीची एंट्री युती- आघाडीसाठी डोकेदुखी ठरली आहे़ परभणी लोकसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत़ त्यामध्ये शिवसेनेकडून विद्यमान खा़ संजय जाधव तर राष्ट्रवादीकडून माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून आलमगीर खान यांचा समावेश आहे़

या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच तिरंगी लढत होत आहे़ परभणी लोकसभा मतदार संघावर १९९१ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे़ या वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण चेहरा देऊन शिवसेनेसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे़ त्यामुळे आपला गड शाबू राखण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांना चांगलाच आटापिटा करावा लागत आहे़

परभणीचे सेनेचेच आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासोबत त्यांचे टोकाचे मतभेद होते़ ते मातोश्रीवर निवडणुकीपूर्वीच मिटल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाय पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे व सध्या भाजपात असलेले पाथरीचे आ़ मोहन फड यांच्यासोबतही खा़ जाधव यांचे तीव्र मतभेद होते़ खा़ जाधव यांच्यामुळेच आ़ फड यांनी शिवसेना सोडली होती़ आता तेही युतीसोबत असल्याचे खा़ जाधव सांगत आहेत़ परंतु, विरोधक मात्र जाधव यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांच्यापासून सर्वचजण दूर गेल्याचे सांगत आहेत़ दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या पाठीशी ५ आमदार, ४ माजी खासदार, ४ माजी आमदार यांचे पाठबळ आहे़ शिवाय त्यांच्याकडून प्रत्यक्ष मैदानात व सोशल मीडियातही आक्रमक पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविली जात आहे़

आतापर्यंत चार वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेने पराभव केल्याने या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्नही राष्ट्रवादीकडून सुरू आहे़ परभणी हे चळवळीचे केंद्र असून, येथे अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या आचारसंहितेपूर्वी दोन वेळा झालेल्या सभांना मोठी गर्दी झाली होती़ त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या मतपेटीला धक्का पोहचविण्याचे काम वंचित आघाडीकडून होवू शकते़ त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांची भीती वाटू लागली आहे़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून गेल्या पाच वर्षांत अनेक विकासात्मक निर्णय घेण्यात आल्याने मतदार खूष आहेत़ त्यामुळे विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरी जनता आमच्या पाठीशी आहे़ परिणामी शिवसेनेचा गड कालही शाबूत होता, आजही आहे व तो भविष्यातही राहील़- संजय जाधव, शिवसेनाशिवसेनेने गेल्या ३० वर्षांत फक्त धार्मिक मुद्यांच्या आधारे निवडणूक लढवून सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे़ त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे़ आता या पक्षाच्या भूलथापांना सुजान मतदार भीक घालणार नाही़ विकासासाठी ते राष्ट्रवादीला साथ देणार आहेत़- राजेश विटेकर, राष्ट्रवादीकळीचे मुद्देशिवसेना-भाजपा युती व राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत मतभेद अद्यापही मिटलेले नाहीत़युती व आघाडीचे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे असले तरी प्रचारात आता पोट जातीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे़प्रमुख उमेदवारसंजय जाधव । शिवसेनाराजेश विटेकर । राष्ट्रवादीआलमगीर खान । वंबआ

टॅग्स :parbhani-pcपरभणीparabhaniपरभणीNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक