शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भर बाजारात दुकान लावण्यावरून सावत्र भावाचा खून; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

By राजन मगरुळकर | Updated: November 7, 2023 18:56 IST

परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल: पंचवीस हजार प्रत्येकी दंड

परभणी : सावत्र भावास कोयत्याने मारून त्याचा खून केल्याच्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकी २५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. हा निकाल परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जिल्हा न्यायाधीश एस. एस.नायर यांनी मंगळवारी दिला आहे. परभणी शहरातील गुजरी बाजार भागात चार एप्रिल २०१९ मध्ये झालेल्या या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फिर्यादी नारायण लक्ष्मण आडणे व त्यांचा भाऊ सोमनाथ लक्ष्मण आडणे हे साखर गाठीचा व्यवसाय करतात. आरोपी नितीन आडणे व सचिन आडणे हे त्यांचे सावत्र भाऊ असून तीन एप्रिल २०१९ ला रात्री गुजरी बाजार येथे लाकडी टेबल लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळेस आरोपीने फिर्यादी व त्याच्या भावास धमकी दिली होती. यानंतर फिर्यादीने दोघांची समजूत घालून भांडण मिटविले होते. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी चार एप्रिलला मयत सोमनाथ आडणे हा त्याच्या ऑटोमध्ये साखरगाठी टाकून विक्री करण्यासाठी गुजरी बाजार येथील टेबल जवळ आला असता त्याच्या पाठोपाठ त्याची आई गंगाबाई लक्ष्मण आडणे यादेखील तेथे आल्या. सोमनाथ टेबलवर गाठ्या लावताना दोघे आरोपी दुचाकीवर आले. त्यांनी मास कापण्याचे सतुर सोबत आणले होते. नितीन आडणे याने सोमनाथ याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यानंतर सचिन याने ते सतुर घेऊन सोमनाथ याच्यावर अनेक वार केले तसेच सिमेंटचा दगड व विटांनी डोक्यात मारहाण केली. यामध्ये मयताची आई ही घटनास्थळ परिसरात आरडाओरड करीत होती. जमलेल्या नागरिकांनी ऑटोत टाकून उपचारासाठी सरकारी दवाखान्यात सोमनाथ यास दाखल केले होते. परंतू, उपचारापूर्वीच तो मयत झाला होता. या घटनेत नारायण आडणे यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आलेसहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्याकडे तपास होता. यामध्ये तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. मयताची आई गंगाबाई व ऑटोमध्ये टाकून नेणारा चालक यांनी न्यायालयासमोर घडलेली घटना नमूद केली. मात्र, ऑटो चालक यामध्ये फितूर झाला. 

२५ हजार रुपये दंडाची शिक्षाजिल्हा न्यायाधीश एस.एस.नायर यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांनी खटला चालविला. अंतिम युक्तीवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीचा खून करण्याचा उद्देश होता व टेबल लावण्याचा कारणावरून खून केला हे सिद्ध केले तसेच प्रत्यक्ष साक्षीदार ही नैसर्गिक साक्षीदार आहे, त्यामुळे तिची साक्ष विश्वासार्ह आहे, असे सांगितले. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने मंगळवारी खटल्याचा निकाल जाहीर केला. त्यामध्ये दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास दोन वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली. 

यांनी पाहिले काम या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी मदत केली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, सुरेश चव्हाण, शिवाजी भांगे, दत्तराव खुणे व पैरवी अंमलदार यांनी मदत केली.

टॅग्स :Courtन्यायालयAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी