शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात युवकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 19:50 IST

काही युवकांनी पाचलेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला.

जिंतूर (परभणी) : अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची थरारक घटना शहरातील पाचलेगाव कमानीजवळ आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा (२१ ) असे मृताचे नाव आहे. तर या हल्ल्यात सोमेश विलास थिटे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हा हल्ला मागील भांडणाच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   

पाचलेगाव  रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा (वय 21) व सोमेश विलास थिटे हे दोघे युवक गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अफोरोज बेग यास वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. तर सोमेश यास प्राथमिक उपचार करीत परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडे हलविले आहे.

ग्रामीण रुग्णालयाची केली तोडफोड गंभीर जखमी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर तात्काळ उपलब्ध न झाल्याने जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव वाढला होता. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी  घटनास्थळी धावून आले. जमाव पांगवतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, मृत अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा हा एका गुन्ह्यात आरोपी होता. काही दिवसांपूर्वीच तो जेलबाहेर आला होता. याच गुन्ह्याच्या कारणातून काही लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. 

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी