लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जुन्याच एलबीटी करावर आधारित महानगरपालिका वसुली करीत असल्याने याविरुद्ध येथील व्यापाºयांनी सुरु केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा न निघाल्याने सोमवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरुच होते.परभणी शहरात स्थानिक संस्थाकराची थकबाकी वसूल करण्याची मोहीम महापालिकेने सुरु केली आहे. या अंतर्गत काही व्यापाºयांवर कारवाई देखील करण्यात आली. व्यापाºयांनी या बेकायदेशीर वसुलीला विरोध केला आहे. १५ सप्टेंबर २०१७ रोजी राज्य शासनाने मनपा आयुक्तांना पत्र पाठवून जुनी एजन्सी रद्द करावी आणि व्यापाºयांना विश्वासात घेऊन नव्याने उपाययोजना करावी, असे सूचित केले होते. त्यामुळे महापालिकेने या संदर्भात उपाययोजना करणे अपेक्षित असताना जुन्याच करावर वसुली सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेने ६ दुकानांना सील ठोकले होते. त्यापैकी दोन दुकाने अजूनही बंद आहेत. महापालिका अन्यायकारकरित्या काम करीत असून या कारवाया रद्द कराव्यात, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.दरम्यान, एलबीटी करासंदर्भात आपल्या न्याय मागण्यांसाठी व्यापाºयांनी शहरातील शिवाजी चौकात ८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. सोमवारी चौथ्या दिवशीही हे आंदोलन सुरु होते.विधानसभेत मांडणार प्रश्न- राहुल पाटीलसोमवारी आ.डॉ.राहुल पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन व्यापाºयांचे म्हणणे जाणून घेतले. स्थानिक संस्था कराच्या प्रश्नावर व्यापाºयांना न्याय मिळवून दिला जाईल. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करुन व्यापाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिले.महानगरपालिकेने केलेल्या कारवाया बेकायदेशीर आहेत. शासनाच्या आदेशाचेही पालन केले जात नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यापुढे एकही दुकान सील होऊ देणार नाही.-सूर्यकांत हाके,अध्यक्ष, व्यापारी महासंघ
परभणीत व्यापाºयांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 01:08 IST