शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीनंतर मातेचा मृत्यु; गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात नातवाईकांचा गोंधळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 16:15 IST

प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेचा प्रसुतीनंतर आज सकाळी साडेदहा वाजेच्या मृत्यू झाला.

गंगाखेड (परभणी ) : प्रसुतीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या गरोदर महिलेचा प्रसुतीनंतर आज सकाळी साडेदहा वाजेच्या मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

पालम तालुक्यातील बोरगाव (खु.) येथील भागवत गंगाधर कदम यांची मुलगी सिमा दिपक मोरे ( वय २२ वर्ष रा. भनगी ता.जि. नांदेड. हल्ली मुक्काम बोरगाव (खु.) ) यांना प्रसुतीकळा येत असल्याने आज सकाळी ९ वाजता गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सिमा यांची साधारणपणे (नॉर्मल) प्रसुती झाली व त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याचे सिमा यांच्या आईला लक्षात आले. त्यांनी ही गोष्ट प्रसुती कक्षाबाहेर असलेले भागवत कदम यांना सांगितली व त्यांनी रुग्णालयात उपस्थित परिचारिकाना याची माहिती दिली. प्रसुतीनंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे सिमा मोरे यांची प्रकृती खालावत गेली. त्यातच सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली.

डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा आरोप सिमा यांचा मृत्यू झाल्याचे समजताच भागवत कदम यांनी आपल्या नातेवाईकांना याची माहिती दिली. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. यावेळी रुग्णालयात उपस्थित डॉक्टर रविंद्र देशमुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत आपला संताप व्यक्त केला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करीत डॉक्टर तसेच ड्युटीवर असलेले इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलWomenमहिलाDeathमृत्यूparabhaniपरभणीPoliceपोलिस