शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्याकडेला वाजत होता मोबाईल; जवळ जाऊन पहिले तर आढळला तरुणाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 19:27 IST

मॉर्निग वॉक करत असलेल्या महिलांना रस्त्याच्या कडेला आढळून आला मृतदेह

पाथरी ( परभणी ) - वडी पाटी ते वडी रस्त्यावर मॉर्निग वॉक करत असलेल्या महिलांना रस्त्याच्या कडेला बराच वेळापासून मोबाईल वाजत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा जवळ जाऊन पाहणी केली असता तेथे एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. 

गोपाळ शिंदे हा तरुण वडी वस्ती येथे राहतो. गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो घरातून वडी गावाकडे गेला होता. रात्री उशिरापर्यंत गोपाळ परत न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. फोन केला असता मोबाईलवर फक्त रिंग जात होती. दरम्यान, आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावातील काही महिला वडी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत होत्या. वडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला मोबाईल वाजत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. महिलांनी जवळ जाऊन पाहिले असता एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला. 

महिलांनी ग्रामस्थांना माहिती दिली असता काहीजण घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता तो गोपाळ शिंदेचा असल्याचे स्पष्ट झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. घटनास्थळी गोपाळची दुचाकी आढळून आली. तसेच मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने हा घातपात की अपघात अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही, अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूparabhaniपरभणी