शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या 'खळखट्याक' आंदोलनाचा महावितरणला 'झटका'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 14:26 IST

मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण कार्यालयालयासह आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

तळणी (जालना) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपवि•ाागीय कार्यालयात तोडफोड केली. वेळोवेळी मागण्या करूनही शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न सोडविण्याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

मंठा तालुक्यातील अनेक गावांमध्ये खंडित वीजपुरवठ्याचा प्रश्न कायम आहे. रोहित्र जळालेले असताना ते दुरूस्त करून दिले जात नाहीत. त्यामुळे अनेक गावे अंधारात असून, शेतकऱ्यांचेही हाल होत आहेत. शहरी, ग्रामीण भागातील वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, मागणीकडे दुर्लक्ष करीत  थकीत वीजबिलाच्या वसुलीचे कारण पुढे करीत गावा-गावातील वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. शेतकरी, सर्वसामान्यांसमोर असलेला विजेचा प्रश्न सोडविण्याऐवजी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नवनिर्माण सेनेचे सिध्देश्वर काकडे, सचिन काकडे, संतोष सहा (रा. जयपूर ता. मंठा) व इतर कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी मंठा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक भूमिका घेतल्याने महावितरण कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  

यापूर्वीही तीव्र आंदोलनयापूर्वी मनसेच्या या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पंचायत समिती कार्यालयातही तोडफोड केली होती. या प्रकरणात संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल आहेत. या कार्यकर्त्यांनी आता विजेच्या प्रश्नावर खळखट्याक आंदोलन करीत महावितरणला ‘झटका’ दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनMNSमनसे