शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:17 IST

विमा कंपन्यांनाच होतो आहे पीक विम्याचा अधिक फायदा; धनंजय मुंडे यांचा आरोप

ठळक मुद्दे शेतकऱ्यांच्या मतांसाठी शिवसेना ढोंग करीत आहे सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी देणे घेणे नाही

गंगाखेड (परभणी ) : शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या पीक विम्याचा फायदा  कंपन्यांनाच अधिक होतो, तसेच शेतकऱ्यांना कमीतकमी पीकविमा मिळावा असा अहवाल करण्याच्या कृषी अधिकाऱ्यांना सरकारच्या सूचना असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केला.

गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मुंडे यांनी गंगाखेड आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती राज्य शासनाकडे मांडून कोरडवाहू शेतकऱ्यांना ५० हजार रुपये व बागायतदार शेतकऱ्यांना एक लाख रुपये आणि इतर भागातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी आम्ही सभागृहात केली. मात्र या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताशी देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर पीक विमा कंपनीच्या विरोधात मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला पाच वर्षात या कंपन्या का दिसल्या नाहीत, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांच्या मतांसाठी शिवसेना ढोंग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

तसेच शेतकऱ्यांना कमीत कमी पीक विमा मिळावा, अशा पद्धतीने अहवाल तयार करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना सरकारकडून दिल्या जात आहेत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, श्रीकांत भोसले, लिंबाजीराव देवकते, बबनराव शिंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीDhananjay Mundeधनंजय मुंडेState Governmentराज्य सरकार