आंबेडकरी सांस्कृतिक संघ आणि रमाई फाऊंडेशन यांच्या वतीने येथील अजिंठा नगरातील बुद्ध विहारात ८ फेब्रुवारी रोजी रमाई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी किरण मानवतकर बोलत होते. कार्यक्रमास प्रमखु पाहुणे म्हणून मनपाच्या बांधकाम सभापती गवळणबाई रोडे, डॉ.विद्याताई कुलदीपके, दि.फ. लोंढे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक रामचंद्र रोडे, विशाल मानवतकर, सुरेश मुळे, शिलाताई कागदे, प्रशांत वावळे, बाबुराव केळकर, आयोजक राहुल वाहिवळ आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. महोत्सवाअंतर्गत महिलांसाठी रोजगार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी माता रमाई, जिजाऊ, सावित्री माता यांच्या वेशभूषा परिधान करुन त्यांच्या जीवन कार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला. कोरोना काळात प्रशासकीय यंत्रणेत काम करणारे करण गायकवाड, डॉ.राहुल रणवीर, प्रशांत वावळे, निलेश कांबळे, अजय भराडे यांचा कोरोना योद्धा म्हणून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पू.आर्याजी सुचितानंद बोधी यांच्या उपस्थितीत सर्वांना त्रिशरण पंचशी देऊन सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक राहुल वाहिवळ, वैभव पाटील, सोहम खिल्लारे, संदीप गायकवाड, अमोल मानवतकर, अनिकेत पाटील, स्वप्नील जाधव, अभिजीत जोंधळे, वैभव काळे, हर्षदीप गायकवाड, बादल कांबळे, सुमित डोळसे, कुणाल रोडे, आकाश बाणमारे, अनिकेत खंदारे, सुनील उजगरे, आकाश ढाले आदींनी प्रयत्न केले.
फोटो : परभणी शहरातील अजिंठानगर येथे आंबेडकरवादी सांस्कृतिक संघाच्या वतीने आयोजित त्यागमूर्ती माता रमाई महोत्सवाचे उद्घाटन करताना पशू संवर्धन अधिकारी किरण मानवतकर. समवेत आयोजक राहुल वाहिवळ, मनपाच्या बांधकाम सभापती गवळणताई रोडे, शिलाताई कागदे, विलास येडे, सोहम खिल्लारे, दि.फ. लोंढे, प्रशांत वावळे, प्रा.अतूल वैराळ, रामचंद्र रोडे, बाबुराव केळकर आदी.
परभणी