यामध्ये पाथरी शहरातील बाजारात दुपारी दोनपर्यंत सर्व रस्ते गर्दीने व्यापले होते. यानंतरही काही ठिकाणी दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहार सुरुच होते.
सोनपेठ येथे शेतमाल साहित्याच्या खरेदीसाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते.
गंगाखेड येथे गर्दी कमी होती. दुपारी दोनला प्रशासनाने बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले.
जिंतूर शहरात रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून आले. बऱ्याच दिवसांनी बाजारपेठ उघडल्याने उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली.
मानवत शहरातील मोंढा येथे शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी गर्दी झाली होती. तसेच मार्केट यार्ड परिसरात वाहतूकीची कोंडी झाली होती.
सेलू तसेच पालम येथे गर्दी झाली नव्हती. दुपारपर्यंत कपडा, भांडी व अन्य साहित्य खरेदीच्या दुकानात ग्राहक दिसून आले.
पूर्णा येथे किराणा, भाजीपाला साहित्य वगळता सर्वच दुकानांवर ग्राहक दिसून आले.