शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी असून याचा विकास करण्यास मी कटिबद्ध - पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 17:29 IST

माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देमराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करणे, वाटरग्रीड मंजूर करून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. ती या वेळीही होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

सोनपेठ (परभणी ) : माझ जन्म जरी बीड जिल्ह्यातला असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रस्ते, सिंचन आदी विकास कामे करणे हे माझे कर्तव्य आहे असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. आज दुपारी वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सोनपेठ येथील नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या वसंतराव नाईक सांस्कृतिक सभागृहाचे आज लोकार्पण झाले.  यावेळी मंचावर महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंञी पंकजा मुंडे, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, आमदार मोहन फड, बाबाजानी दुर्राणी, हरिभाऊ राठोड, माजी. जि.प अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष जिजाबाई राठोड, चंद्रकांत राठोड, बाळासाहेब रोकडे, अभय चाटे, विठ्ठल रबदडे आदींची उपस्थिती होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मला वंचीत व दुर्बल घटकाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे ती मी शेवटच्या श्वासापर्यंत निभावणार. यामुळेच माझा जन्म जरी बीड जिल्ह्यातील असला तरी संपूर्ण मराठवाडा माझी कर्मभूमी आहे असे मी मानते. 

मराठवाड्याचा विकास करणार त्या पुढे बोलताना म्हणाल्या, मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करणे, वाटरग्रीड मंजूर करून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. यासोबतच गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. ती या वेळीही होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

यावेळी मकरंद अनासपुरे, मोहन फड, हरिभाऊ राठोड, राजेश विटेकर, चंद्रकांत राठोड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांनी केले तर सुञसंचालन व आभार मधूकर उमरीकर यांनी मानले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेparabhaniपरभणी