शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 14:05 IST

untimely rains in Parbhani district परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली.

ठळक मुद्देजिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे.शेतात काढून ठेवलेली ही पिके भिजून गेली.

परभणी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहु आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

परभणी शहरासह परिसरात गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरुच होत्या. या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिंतुर तालुक्यातील येलदरी, सावंगी म्हाळसा, माणकेश्वर, आंबरवाडी, किन्ही, सावळी, घडोळी, मुरूमखेडा, हिवरखेडा, सावळी, केहाळ भागात तसेच मानवत तालुक्यातील मानोली, रामपूरी पालम तालुक्यातील बनवस आदी परिसरातील गव्हाच्या पिकाचे तसेच हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या शेतात गहू, हरभरा आदी पिके काढण्याचे काम सुरु आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेली ही पिके भिजून गेली.

जिल्ह्यात सलग दोन दिवस पाऊसजिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. बुधवारी जिल्ह्यात ७.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळीही महसूल विभागाकडे जिल्ह्यात ८.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यात परभणी तालुक्यात ७.४ मिमी, गंगाखेड तालुक्यात ५.६ मिमी., पाथरी तालुक्यात १२.८ मिमी., जिंतूर तालुक्यात ६.४ मिमी, पूर्णा तालक्यात ४.३ मिमी, पालम तालुक्यात ३.९ मिमी, सेलू तालुक्यात ९.८ मिमी, सोपेठ तालुक्यात १२.८, आणि मानवत तालुक्यात ७.५ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती