शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 18:07 IST

शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती.

परभणी: महिलेच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पोलीस कर्मचारी संतोष जाधव यास सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी ५ नोव्हेंबर रोजी काढले आहेत.

शहरातील हडको परिसरातील सरगम कॉलनीतील रमा विठ्ठल सदावर्ते या महिलेचा खून झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. या प्रकरणात मयत महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी संतोष जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी कर्मचाऱ्यास अटक करुन त्याचा तपास केला.  चौकशी दरम्यान या कर्मचाऱ्याने महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणात पोलीस कर्मचारी संतोष जाधव यास सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी काढला आहे.

तीन पोलीस निलंबित अवैध धंदेचालकांशी आर्थिक फायद्यासाठी संबंध ठेवल्याचे उघड झाल्याने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश ५ नोव्हेंबर रोजी काढले आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सय्यद उमर सय्यद अमीन, मुक्तारखाँ रतनखाँ पठाण आणि राजेश रमेशराव मस्के या तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील अभिलेखानुसार मोटारसायकलवरुन गस्त घालण्याच्या कर्तव्यावर नेमले असताना प्रत्यक्षात नेमलेले कर्तव्य कधीच पार पाडले नाही. स्वत:च्या फायद्यासाठी व आर्थिक लाभासाठी अवैध व्यावसायिकांशी वारंवार संपर्कात राहून वेळोवेळी ठराविक रक्कम घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही न करता स्वत:ला गैरकायदेशीर धंद्यात सामील करुन घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणीsuspensionनिलंबन