शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

परभणी समाजकल्याण विभागाकडून महावितरणकडे ४२ लाखांचा निधी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 17:31 IST

समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे.

परभणी : समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. 

जिल्ह्यामध्ये महावितरणचे २ लाख वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांना महावितरणच्या परभणी शहर, पाथरी, पूर्णा, गंगाखेड, सेलू, जिंतूर, सोनपेठ, मानवत, पालम व परभणी ग्रामीण या १० उपविभागांतर्गत वीज पुरवठा केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून  वीज ग्राहकांकडे महावितरणचा थकबाकीचा डोंगर वाढला आहे. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील ९३ हजार ३६५ वीज ग्राहकांकडे ७७४ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये परभणी शहर उपविभागांतर्गत दीडशे ग्राहकांकडे १७४ कोटी ९५ लाख, परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५ हजार ५१५ ग्राहकांकडे ४२ कोटी २४ लाख ४६ हजार, पाथरी ३ हजार २०६ ग्राहकांकडे २३ कोटी ४० लाख २७ हजार, पूर्णा २ हजार ६०९ ग्राहकांकडे १९ कोटी ५ लाख ९९ हजार, गंगाखेड २ हजार ४७८ ग्राहकांकडे १७ कोटी २० लाख २६ हजार, सेलू ३ हजार ५४९ ग्राहकांकडे २४ कोटी ४२ लाख ५५ हजार, जिंतूर ५ हजार ५१३ ग्राहकांकडे ५१ कोटी ५२ लाख ६८ हजार, सोनपेठ १ हजार २०५ ग्राहकांकडे १० कोटी ३३ लाख ६ हजार, पालम २ हजार ४४७ ग्राहकांकडे ११ कोटी ९३ लाख ५३ हजार, मानवत २ हजार ५०६ ग्राहकांकडे १७ कोटी ६२ लाख ४८ हजार अशी थकबाकी आहे.

त्यामुळे जिल्ह्यामध्ये विजेच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरण कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठ स्तरावरुन थकबाकी अभावी दुरुस्तीचे सामान मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यामध्ये वीज पुरवठा सुरळीत करताना महावितरणला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, समाजकल्याण विभागाने अनुसूचित जाती व जमातीतील वीज ग्राहकांना घरगुती वीज जोडणी व कृषी पंपाची वीज जोडणी देण्यासाठी ४२ लाख रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात विजेच्या समस्या मार्गी लागणार आहेत. 

नियोजनच्या निधीकडे लक्षजिल्ह्यामध्ये भेडसावणार्‍या विजेच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून महावितरणला जवळपास १ कोटी रुपयांचा निधी देण्यात  येणार आहे. या निधीतून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करण्यात येणार आहेत. परंतु, अद्यापपर्यंतही जिल्हा नियोजनमधून महावितरणला निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे विजेच्या समस्या जैसे थे आहेत. याबाबत महावितरणने जिल्हा नियोजनमधून निधी मिळावा, यासाठी पत्र व्यवहार केला आहे. हा निधी मिळताच विजेच्या समस्या सोडविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणparabhaniपरभणी