शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडात महाविकास आघाडीला धक्का;तीन मते फुटली,सभापदीपदी रासपकडून साहेबराव भोसले

By मारोती जुंबडे | Updated: May 23, 2023 17:18 IST

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १० व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या रासपाचे ८ सदस्य निवडून आले होते.

गंगाखेड: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहूमत असतांनाही तीन संचालक फुटल्याने सभापतीपदी रासपकडून साहेबराव भोसले यांची तर उपसभापतीपदी संभाजी पोले यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीने बाजार समितीवर आमदार डाॅ.रत्नाकर गुट्टे यांचे वर्चस्व राहिले.

गंगाखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संदीप तायडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहात रासप व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे ८ संचालक आणी महाविकास आघाडीचे ३ असे एकूण ११ संचालक उपस्थित होते. यात महाविकास आघाडीचे साहेबराव भोसले, सुशांत चौधरी,मनकर्णाबाई घोगरे यानी रासपच्या संचालकासोबत गेल्याने महाविकास आघाडीत फुट पडली. महाविकास आघाडीचे ७ सदस्य या निवडणूक प्रक्रियेस गैरहजर राहिले.यावेळी सभापती पदासाठी साहेबराव भोसले, उपसभापती पदासाठी संभाजी पोले यांचाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी बालासाहेब निरस, संभाजी पोले, कविता सावंत, शंभूदेव मुंडे, ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत काबरा, प्रमोद धुळे, माणिकराव आळसे यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत ढोल- ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत गंगाखेड शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

सात सदस्य राहिले गैरहजरगंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १० व आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या रासपाचे ८ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे १० जागा असल्याने सभापती व उपसभापतीपदी आघाडीचे सदस्य निवडून येतील अशी अपेक्षा होती. मात्र ती मंगळवारी फोल ठरली. महाविकास आघाडीचे ३ सदस्य आमदार गुट्टे यांच्या सोबत गेल्याने महाविकास आघाडीत फूट पडली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अभय कुंडगीर, भगवान सानप, कांताबाई जाधव, उद्धव सातपुते, उमाकांत कोल्हे, नारायण देशमुख, सिद्धांत भालके हे सात सदस्य मात्र विशेष सभेस अनुपस्थित राहिले.

टॅग्स :parabhaniपरभणीmarket yardमार्केट यार्ड