शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : महायुती अन् आघाडीत परभणी जिल्ह्यात बंडखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 11:41 IST

बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देरत्नाकर गुट्टे जेलमधून लढणार

- अभिमन्यू कांबळे

परभणी : जिल्ह्यातील चार  मतदारसंघात शिवसेना- भाजप महायुती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत बंडखोरी कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांना प्रचारात चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

परभणी मतदारसंघात  १२ जणांनी आपले अर्ज परत घेतल्याने १५ उमेदवार  रिंगणात  आहेत. प्रमुख लढत शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील, काँग्रेसचे रविराज देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे मोहंमद गौस झैन आणि एमआयएमचे अली खान यांच्यात होत आहे. एमआयएमचे अलीखान हे राष्ट्रवादीचे नगरसेवक असून परभणीची जागा काँग्रेसकडे असताना त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. परभणी मनपातील राष्ट्रवादीच्या गटनेत्या चाँद सुभाना जाकेर खान यांचे पती जाकेर अहेमद खान मोईन अहेमद खान यांनी मात्र माघार घेतली आहे. 

गंगाखेडमध्ये ८ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे डॉ. मधुसूदन केंद्रे,  युतीचे विशाल कदम, रासपचे रत्नाकर गुट्टे, वंचितच्या करुणा कुंडगीर आणि अपक्ष माजी आ.सीताराम घनदाट या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. येथे महायुतीत फूट पडली आहे. गंगाखेडची जागा शिवसेनेला सुटली असताना रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे. शिवसेनेचे बालासाहेब निरस यांनी मात्र येथून माघार घेतली. आघाडीत काँग्रेसच्या जि.प.सदस्या करुणा कुंडगीर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केली. ती कायम ठेवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. केंद्रे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. 

पाथरीतही महायुतीत बंडखोरी झाली. ही जागा भाजपकडे असताना येथून सेनेचे डॉ.जगदीश शिंदे यांनी उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे आ. फड यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुंजाजी कोल्हे, माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, डॉ.राम शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पी.डी.पाटील यांनी आपले अर्ज परत घेतले आहेत. 

जिंतूरमध्ये चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामध्ये माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपचे खंडेराव आघाव आदींचा समावेश आहे. आता येथे भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आ. विजय भांबळे, शिवसेनेचे बंडखोर राम खराबे, वंचित बहुजन आघाडीचे मनोहर वाकळे आदी प्रमुख उमेदवार १३ जण  रिंगणात आहेत. शिवसेनेचे राम खराबे यांनी उमेदवारी कायम ठेवली. २०१४ ची विधानसभा खराबे यांनी  सेनेकडून लढली होती. यंदा त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केला; परंतु, त्यांनी उमेदवारी कायम ठेवण्यावर ठाम राहिले.  

रत्नाकर गुट्टे जेलमधून लढणारपरभणीच्या कारागृहात असलेले रासपचे प्रदेश उपाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेडमधून रासपकडून उमेदवारी दाखल केली आहे. या जागेवर शिवसेनेचे विशाल कदम हे लढत आहेत. त्यामुळे सोमवारी गुट्टे हे माघारी घेतील, अशी अपेक्षा होती; परंतु, त्यांनी माघार घेतली नाही व अर्ज कायम ठेवला.त्यामुळे आता गुट्टे हे कारागृहात राहूनच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे जावई तथा रासप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्या खांद्यावर आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीgangakhed-acगंगाखेडparbhani-acपरभणीjintur-acजिंतूरpathri-acपाथरी