शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
2
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
3
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
4
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
5
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
6
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
7
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
8
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
9
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
10
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
11
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
12
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
13
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
14
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
15
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
16
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
17
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
18
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
19
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
20
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...

Maharashtra Election 2019 : परभणीच्या बालेकिल्ल्यात सेनेसमोर नवख्यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 18:31 IST

पुढील ११ दिवस उडणार प्रचाराचा धुराळा 

ठळक मुद्दे१५ उमेदवार रिंगणात

- अभिमन्यू कांबळे

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी विधानसभा मतदारसंघात सेनेसमोर यावेळेस काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसह अपक्ष उमेदवारांने आव्हान राहणार आहे. १९९० पासून परभणी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व  आहे. या मतदारसंघात शिवसेनेने १९९० ते २०१४ या सलग सहा निवडणुकांमध्ये विजय मिळविला आहे़ आता पुन्हा एकदा शिवसेना सातव्यांदा विजय मिळविण्याच्या इराद्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

यासाठी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अनेक महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी चालविली आहे़ त्यांच्या विरोधात काँग्रेसचे रविराज देशमुख उतरले आहेत़ देशमुख हे पहिलीच निवडणूक लढवित असून, उमेदवारी मिळविताना त्यांनी सुरेश नागरे यांच्यावर मात केली़ काँग्रेसचे मराठवाडा प्रभारी माजी खा़ राजीव सातव यांच्यावरील निष्ठा देशमुख यांच्या कामी आली व सातव यांनी दिल्लीत वजन खर्ची करून देशमुख यांना उमेदवारी मिळवून दिली़ परभणीत प्रारंभी नागरे यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती़ नागरे यांनी तशी वातावरण निर्मिती केली होती़ शहरभर ‘मी परेशान परभणीकर’ नावाने त्यांनी राबविलेली मोहीम चर्चेचा विषय होती; परंतु काँग्रेसचे तिकीट मिळविण्यात त्यांना यश आले नाही़ परिणामी ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत़  वंचित बहुजन आघाडीकडून मोहम्मद गौस झैन निवडणूक लढवित आहेत. गेल्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची ४५ हजार मते घेणाऱ्या एमआयएमकडून यावेळी अली खान निवडणूक लढवित आहेत. प्रहारचे शिवलिंग  बोधने यांच्यासह अन्य उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवाय प्रमुख पक्षांचे उमेदवार नवीन असल्याने शिवसेनेसमोर त्यांनी आव्हान निर्माण केले आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- परभणी ते जिंतूर, परभणी ते गंगाखेड, परभणी ते मानवत रोड, परभणी ते वसमत या सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, यासाठी निधी मंजूर होऊन कामे सुरू झाली; परंतु, या कामांना  गती नाही़ त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून परभणीत प्रवेश करताना मोठा त्रास सहन करावा लागतो़ - परभणी शहरातील औद्योगिक वसाहतीला उतरती कळा लागली आहे़ उद्योग नसल्याने व नवीन उद्योगही येत नसल्याने रोजगारासाठी तरुण पुणे, मुंबईकडे धाव घेत आहेत़ या प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष झाले आहे़ - परभणी शहरातील मनपाचे अनेक आरोग्य केंद्र बंद असून, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे़ शहरातील शिवाजी पार्क, नेहरू पार्कच्या कामासाठी कोट्यवधी  रुपयांचा निधी उपलब्ध झाला; परंतु, मनपाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना त्याचा फायदा झाला नाही़ नाट्यगृहाचा प्रश्न प्रलंबित आहे़ 

डॉ़ राहुल पाटील (शिवसेना)- गेल्या पाच वर्षात मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली़ आरोग्य शिबीर, रोजगार मेळावा, महिला बचत गटांचा मेळावा आदींच्या माध्यमातून ५ वर्षांत सातत्याने सक्रिय राहिले़ कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क उभारुन निवडणूक यंत्रणा सक्रिय केली़

रविराज देशुमख (काँग्रेस)तरुण व नवीन चेहऱ्यास काँग्रेसने या निवडणुकीत तिकीट दिले आहे़ कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असले तरी पहिल्याच निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत़ 

मोहम्मद गौस (वंचित)लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ला चांगली मते मिळाली़ आता सामाजिक समीकरण जुुळवत विजय मिळविण्याच्या इराद्याने गौस झैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे़ राजकीय अनुभव पाठीशी असल्याने वंचितच्या अपेक्षा वाढल्या आहेत़ 

सुरेश नागरे (अपक्ष)काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल या अपेक्षेने दीड महिन्यात मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रचार चालविला़ धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने घेतलेला सहभाग चर्चेचा विषय झाला़ इतर पक्षातील नेत्यांची मदत घेऊन नागरे निवडणुकीच्या आखाड्यात  उतरले आहेत़

2०14 चे चित्रराहुल पाटील (शिवसेना-विजयी)  स.खालेद स.साहेबजान (एमआयएम-पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parbhani-acपरभणीShiv Senaशिवसेना