शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
2
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
3
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
4
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
5
बांग्लादेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; 'या' तारखेला मतदान, मात्र शेख हसीनांच्या पक्षावर बंदी
6
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
7
“लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्यावे, अन्यथा CM फडणवीसांनाच घरी बसावे लागेल”: उद्धव ठाकरे
8
शालेय सहलींसाठी STलाच उदंड प्रतिसाद; एका महिन्यात तब्बल २२४३ बस आरक्षित, १० कोटींची कमाई
9
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
10
IPL 2025 Auction : ‘छप्पर फाड’ कमाई करण्यासाठी परदेशी खेळाडूनं खेळला असा डाव; सगळेच झाले थक्क!
11
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
12
नवा ट्रेंड! स्किन केअरसाठी 'हे' खास ड्रिंक पीत आहेत Gen-Z; पण खरंच किती होतो फायदा?
13
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
14
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
15
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
16
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
17
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
18
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
19
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
20
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : रासपच्या उमेदवारासाठी मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 14:03 IST

Maharashtra Election 2019 : पैसे वाटताना आचारसंहिता पथकाने केली ईसाद येथे कारवाई

गंगाखेड : राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैस्यांचे आमिष देण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री तालुक्यातील ईसाद येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघांना आचारसंहिता पथकाने ताब्यात घेतले. शनिवार (दि.१९ ) पहाटे त्यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक काळात पैशाच्या वाटपाने राज्यात प्रसिद्धीस आलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखविले जात असल्याची जोरदार चर्चा सुरु आहेत. यामुळे सतर्क झालेल्या निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी आचारसंहिता पथकास मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडीवर बारकाईने लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी (दि. १८) रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुक्यातील ईसाद येथे काही लोक मतदारांना पैशाचे वाटप करीत असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वरूप कंकाळ यांना मिळाली. त्यांनी आचारसंहिता पथकातील शिवाजी दामोदर चिखले, पी. एन. स्वामी, पोलीस जमादार बेग, फोटोग्राफर अनिल कांबळे यांच्या पथकाला ईसाद येथे रवाना केले.

रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास पथकाने अहिल्याबाई नगर येथील एका गल्लीतून हातात रजिस्टर घेऊन येत असलेल्या दोन इसमांना आचारसंहिता पथकाने थांबवुन चौकशी केली. तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच त्यांच्याजवळील रजिस्टरची पाहणी केली असता त्यात 'ईसाद बुथ क्रमांक ३ ' असे लिहून पुढे ४३ पुरुष, महिलांची नावे लिहिलेली यादी मिळून आली. तसेच दि. १६ सप्टेंबर ही तारीख टाकलेले व निळानाईक तांडा ४०० मतदान लिहिण्याबरोबर दौलत मोतीराम चव्हाण १०, रमेश विश्वनाथ राठोड १४, यादी क्रमांक व तिसऱ्या पानावर पाच लोकांची नावे लिहून त्यांच्या नावासमोर पाच हजार, सहा हजार, तीन हजार, सात हजार असे लिहिलेले आढळून आले. रजिस्टरच्या मधल्या जोड पानावर ४३ पुरुष व महिलांचे नावे लिहिलेले व त्यासमोर  १, २, ३, ४, ५, ६, ७ असे अंक लिहिलेले आढळून आले. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ (पाचशे रुपये दराच्या ३४ नोटा) रोख १७ हजार रुपये मिळून आले. 

यात दोघेही रासपा उमेदवार रत्नाकर गुट्टे यांना मतदान करा म्हणून पैसे वाटप करीत असल्याचे निष्पन्न झाले. यावरून गोपीनाथ वामनराव भोसले (४२, रा. ईसाद ) व संजय नाथराव राठोड (३२,रा. वसंत नगर, परळी ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी मतदारांची नावे लिहिलेल्या रजिस्टर, रोख रक्कम १७ हजार रुपये तसेच २१५०० रुपये किंमतीचे तीन मोबाईल असा एकूण ३८५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोघांविरुद्ध मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करून आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शनिवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहे.

जेलमधून लढत आहेत रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे हे शेतकरी कर्ज घोटाळा प्रकरणात मागील काही महिन्यांपासून जेलमध्ये आहेत. तसेच रासपच्या वाट्याचा हा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला आहे. मात्र रत्नाकर गुट्टे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार करत जेलमध्ये असतानाही आपली उमेदवारी दाखल केली आहे. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही गुट्टे यांच्यावर मतदारांना पैसे वाटप केल्याचे दोन गुन्हे दाखल होती. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019gangakhed-acगंगाखेडMONEYपैसाparabhaniपरभणीCode of conductआचारसंहिता