शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

Lok Sabha Election 2019 : परभणीत राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 13:56 IST

परभणी लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या विजयात इतर पक्षांचा अडसर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ हे इतर पक्षच शिवसेनेच्या पथ्यावर पडत आहेत़ 

- अभिमन्यू कांबळे, परभणी

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड़ गणेशराव दुधगावकर यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांचा ६५ हजार ४१८ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार राजश्री जामगे यांना ६४ हजार ६११ मते मिळाली होती़ म्हणजेच दुधगावकर यांच्या विजयी आघाडीपेक्षा फक्त ८०७ कमी मते बसपाने उमेदवाराने मिळविली होती़ तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार बबन मुळे यांनी ११ हजार ८६१ मते मिळविली होती़ लोकविकास पार्टीचे उमेदवार सय्यद इक्रामोद्दीन यांनी ९ हजार १९८,  भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार गंगाधर भांड यांनी ८ हजार ६७७ तर स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार मानवेंद्र काचोळे यांनी ८ हजार ४९६ मते मिळविली होती़ याशिवाय ७ अपक्ष उमेदवारांनी ५७ हजार ८३८ मते मिळवीत राष्ट्रवादीला विजयापासून दूर ठेवले होते़ 

2014 च्या  लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीचा शिवसेनेने १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़ या निवडणुकीत शिवसेनेचे संजय जाधव यांना ५ लाख ७८ हजार ४५५, तर राष्ट्रवादीचे विजय भांबळे यांना ४ लाख ५१ हजार ३०० मते मिळाली होती़ याशिवाय या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार गुलमीर खान यांना ३३ हजार ७१६ तर सीपीआयचे उमेदवार कॉ़ राजन क्षीरसागर यांना १२ हजार ४०४ आणि समाज पार्टीचे उमेदवार अ‍ॅड़ अजय करंडे पाटील यांना ५ हजार ५०७ मते मिळाली होती़ भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार बबन मुळे यांना  हजार १५४ मते मिळाली होती़ आम आदमी पार्टीच्या उमेदवार सलमा कुलकर्णी यांना ४ हजार ४४९ मते मिळाली होती़ तसेच मजलीस बचओ तहेरिकचे उमेदवार शेख सलीम यांना २ हजार ९४७ तर वेल्फेअर पार्टी आॅफ इंडियाचे उमेदवार सय्यद अब्दुल यांना २ हजार ४९२ आणि आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अशोक अंभोरे यांना १ हजार ८८९ मते मिळाली होती़ 

११ पक्षांना मिळालेली मते 1,00,000२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या ११ पक्षांनी १ लाख ७ हजार ६९ मते मिळविली होती, तर ६ अपक्ष  उमेदवारांनी ३७ हजार ७५० मते मिळवित राष्ट्रवादीच्या विजयात अडसर निर्माण केला होता़ या निवडणुकीत राष्ट्रवादीचा शिवसेनेने १ लाख २७ हजार १५५ मतांनी पराभव केला होता़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकparbhani-pcपरभणीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना