शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:10 IST

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आहे.

परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे ही लढत आता सेना - भाजप व भाजप बंडखोर अशी तिहेरी होईल.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया, सुशीलकुमार सुरेशराव देशमुख, भाजपचे सुरेश कुंडलिकराव नागरे आणि डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले़ होते. या पाचही उमेदवारांची अर्ज छाननीमध्ये वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार असलेले सुशीलकुमार सुरेशराव देशमुख आणि भाजपचे डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे ही लढत आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश कुंडलिकराव नागरे यांच्यात होईल.

वेळेत पोहचू शकलो नाही भाजपचे सुरेश नागरे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिल्याने या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. याबाबत बोलताना नागरे म्हणाले कि, मी वेळेत पोहचू शकलो नाही, यामुळे अर्ज मागे घेता आला नाही. शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे अधिकृत उमेदवार असताना नागरे यांचीही उमेदवारी कायम राहिल्याने आता निवडणुकीत चुरस वाढली आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसparabhaniपरभणीHingoliहिंगोली