शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिकडे बजेटमध्ये कोटींच्या घोषणा, इकडे साधा पूल होईना; विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:48 IST

फुलवाडीतील विद्यार्थी जीव धोक्यात घालून गिरवत आहेत आयुष्याचे धडे

जिंतूर : तालुक्यातील फुलवाडी येथे ओढ्यावरील पुलाचे काम न झाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या गावातील विद्यार्थी जीव धोक्यात घालून शिक्षणच नव्हे तर आयुष्याचे धडे गिरवत आहेत. याचे प्रशासनाला, राजकीय मंडळींना गांभीर्य नसल्याने ग्रामस्थांना दर पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यास अशीच जीवघेणी कसरत करावी लागते.

आडगाव- इटोली रस्त्यावर जवळपास ५०० लोकसंख्या असलेले फुलवाडी हे छोटेसे गाव. मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ ५०० - ७०० फुटाचे अंतर आहे. तत्कालीन खासदार गणेशराव दुधगावकर यांच्या फंडातून या ठिकाणी रस्ता करण्यात आला होता. त्यानंतर ठक्कर बाप्पा योजनेतून सात लाख रुपये खर्चून पुन्हा रस्ता झाला. मात्र, गाव आणि पाटी यांना जोडणारा पुलाचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात हा पूर्ण रस्ता पाण्याखाली जातो. गावातून पहिली ते बारावी पर्यंत चे शंभर ते सव्वाशे विद्यार्थी बाहेर गावाच्या वेगवेगळ्या शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात. काही विद्यार्थी आश्रम शाळेत काही विद्यार्थी गडदगव्हाण तर काही विद्यार्थी आडगाव बाजार येथे शिक्षणासाठी दररोज जाणेयेणे करतात. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. 

मोठा पाऊस येऊन ओढ्याला पाणी आले तर विद्यार्थ्यांना कधी गडदगव्हाण तर कधी आडगावला मुक्काम करावा लागतो. शेतात मजुरीसाठी गेलेल्या लोकांनाही पाण्यामुळे गावात येत नाही. पाणी कमी झाल्यानंतर पालकाच्या मदतीने ओढा ओलांडून विद्यार्थी शाळेत जातात. ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून या भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पुल मंजूर करावा अशी मागणी होत आहे. पुलासाठी मोठा खर्च आहे पण येथे मतदार संख्या कमी असल्याने कोणतेच राजकीय नेतृत्व पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. आज देशाचे बजेट सादर करताना करोडोंच्या योजनांच्या घोषणा झाल्या, मात्र इकडे वर्षानुवर्ष मागणी करूनही ओढ्यावर साधा पूल होत नाही, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. 

आता तर बस ही बंदआडगाव इटोली मार्गावर नेहमी धावणाऱ्या बस व शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या मानव विकासच्या बस मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. आडगाव -इटोली रस्त्यावर काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर गिट्टी अंथरूण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील बस बंद असल्याचे दिसत आहे. यामुळे  शाळकरी मुलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे

हे चित्र केव्हा बदलणारजिंतूर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे या रस्त्यांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद विभागाचे कोणतेही लक्ष नाही. एकीकडे कोट्यावधी रुपयांचे बजेट खर्च करीत असताना गावातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

अनेक वर्षांपासून जीवघेणा प्रवासफुलवाडी येथील पुलाच्या कामाच्या संदर्भात अनेक वेळा प्रशासकीय, राजकीय पातळीवर पाठपुरावा केला. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. मागील अनेक वर्षापासून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करीत आहेत. - श्रीरंग राठोड, ग्रामस्थ, गडद गव्हाण

टॅग्स :Schoolशाळाparabhaniपरभणी