परभणी: जिंतूर तालुक्यातील गायरानधारकांची प्रश्न सोडवून न्याय दिला जावा, अशी ग्वाही तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी दिली आहे.रिपाइंचे राज्य संघटक डी.एन.दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १० फेब्रुवारीरोजी तहसीलदार सखाराम मांडवगडे यांची भेट घेतली. गायरान जमिनी नियमानुकूल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने चर्चा झाली. गायरानधारकांना सातबारा नोंदविण्यासाठी रिपाइंच्या वतीने सातत्याने आंदोलने करण्यात आली.मात्र अद्यापपर्यंत न्याय मिळाला नव्हता. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गायरान जमिनीसंदर्भात चौकशी अहवाल सादर करण्याचे अहवाल तहसीलदारांना दिले आहेत. गायरानधारकांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला जाईल, असे तहसीलदार मांडवगडे यांनी शिष्टमंडळास सांगितले. यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस टी.अर.डाके, भगवान कांबळे, सतीश दामोधरे, भीमराव खाडे, रंगनाथ वाकळे, रामकिशन वाकळे, भीकाजी वाकळे, नाना चव्हाण यांच्यासह गायरानधारक उपस्थित होते.
गायरानधारकांचे प्रश्न सोडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST