टाकसाळे यांनी शनिवारी या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी डॉ. रामेश्वर नाईक यांचीही उपस्थिती होती.
टाकसाळे म्हणाले, जि. प. कोविड रुग्णालयात सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधी आणण्याची आवश्यकता नाही. गरजेनुसार आणखी इंजेक्शन आणि औषधी दिली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या रुग्णालयात २६४ रुग्ण उपचार घेत आहेत. यावेळी टाकसाळे यांनी वाॅर्डात फिरून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी डॉ. दुर्गादास पांडे, डॉ. अशोक बन, डॉ. सारंग, डॉ. संजय मस्के, डॉ. नितीन कदम, डॉ.नाकोड, फार्मासिस्ट गणेश कराड, कर्मचारी सुजाता कांबळे आदींची उपस्थिती होती.