शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये निम्माच पाणीसाठा शिल्लक; आरक्षित पाण्याच्या संरक्षणाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:10 IST

परभणी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली आहे

परभणी : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि गाव तलावांमध्ये क्षमतेच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तसेच येलदरीसारख्या मोठ्या प्रकल्पात अवघा ५ टक्के पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाईची चिंता वाढली असून, टंचाई काळामध्ये हे पाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली़ येलदरी आणि निम्न दूधना या दोन मोठ्या प्रकल्पांबरोबरच दोन मध्यम प्रकल्प आणि २२ लघु प्रकल्पांवर जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे़ गतवर्षी परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा जमा झाला नाही़ परिणामी यावर्षी उन्हाळ्यातील टंचाईच्या झळा अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ जिल्हा प्रशासनाने सुमारे ४१८ गावे संभाव्य पाणीटंचाईची घोषित केली आहेत़ या गावांना होणारा पाणीपुरवठा हा मुख्य प्रकल्पांमधूनच केला जातो़ त्याच प्रमाणे प्रकल्पातील पाणीसाठा घटत असल्याने परिसरातील भुजल पातळीतही लक्षणीय घट होत आहे़ परिणामी आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट जानेवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच तीव्र होत असल्याचे दिसत  आहे. 

परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यांचा आढावा घेतला तेव्हा बहुतांश प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यापर्यंतच पाणीसाठा उपलब्ध असल्याचे दिसत आहे़ क्षमतेच्या तुलनेत प्रकल्पातील पाणीसाठा कमी असल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पात ६३़६७ टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे़ या प्रकल्पाची पाणी क्षमता ३४४़८०० दलघमी एवढी आहे़ यात २४२़२०० दलघमी जीवंत पाणीसाठा असतो़ यावर्षी प्रकल्पामध्ये १५४़२०० दलघमी जीवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ तर झरी येथील प्रकल्पामध्ये ०़९१६ दलघमी, करपरा मध्यम प्रकल्पात १३़३७३ दलघमी, मासोळी प्रकल्पात ३़३६८ दलघमी, डिग्रस बंधार्‍यात ३१़८९० दलघमी, मुदगल बंधार्‍यात ८़५६० दलघमी, ढालेगाव ७़८०० दलघमी आणि पिंपळदरी तलावामध्ये ०़७०१ दघलमी पाणीसाठा शिल्लक आहे़ गतवर्षीच्या पाणीसाठ्याची तुलना करता यावर्षी प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गंभीर झाले आहे.

मुळी बंधारा कोरडाठाकगंगाखेड तालुक्यातील मुळीचा बंधारा पावसाळ्यापासूनच कोरडाठाक आहे़ केवळ नियोजन नसल्याने या बंधार्‍यात पाणीसाठा झाला नाही़ बंधार्‍याचे दरवाजे खराब झाले आहेत़ भर पावसाळ्यात बंधार्‍याला दरवाजे बसविणे अपेक्षित होते़ परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ त्यामुळे बंधार्‍यातील सर्व पाणी वाहून गेले आहे़ ११़३५० दलघमी क्षमतेचा हा बंधारा असून, सध्या बंधार्‍यामध्ये १़२४२ दलघमी पाणी आहे़ तर जीवंत पाणीसाठा उपलब्धच नाही़ त्यामुळे हा बंधारा कोरडाठाक पडला असून, गंगाखेड शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ गंगाखेड शहरातील निम्म्या भागाला मुळी बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो़ मात्र बंधारा कोरडा असल्याने आता या भागाला मासोळी प्रकल्पातून पाणी द्यावे लगणार आहे़ 

येलदरी प्रकल्पात साडेपाच टक्के पाणीजिंतूर तालुक्यातील येलदरी हा परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे़ मात्र याच प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने जिल्हावासियांच्या चिंता वाढल्या आहेत़ ९३४़४४ दलघमीचा हा प्रकल्प असून, त्यात केवळ ४४़३१२ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ विशेष म्हणजे गतवर्षी देखील या प्रकल्पात समाधानकारक पाणी उपलब्ध नव्हते़ गतवर्षी २६़३ टक्के पाणीसाठा होता़ यावर्षी तो ५़४७ टक्क्यांवर घसरला आहे़ येलदरी प्रकल्पावर येलदरी गावासह जिंतर शहर, जिंतूर तालुक्यातील शेकडो गावे त्याच प्रमाणे परभणी शहर, पूर्णा, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली या मोठ्या शहरांचाही पिण्याच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे़ परभणी, पूर्णा या गावांसह हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे़ 

‘निम्न दूधना’चाच आधारमागील वर्षीपासून सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पाचा जिल्ह्याला मोठा आधार झाला होता़ मागील वर्षी या प्रकल्पातून परभणी शहरासाठी पाणी घेण्यात आले़ विशेष म्हणजे यावर्षी देखील परभणी आणि पूर्णा या दोन्ही शहरांसाठी प्रकल्पातून पाणी घेतले आहे़ निम्न दूधना प्रकल्पात ६३ टक्के पाणी उपलब्ध असून, या पाण्यावरच परभणी शहरासह पूर्णा, सेलू आणि मानवत या चार मोठ्या शहरांबरोबरच चारही तालुक्यांतील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी