शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Samrudhi Mahamarg: समृद्धी महामार्गामुळे जमिनींच्यां किमतीला समृद्धी, दर पोहोचला एकरी तब्बल ६० लाखांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:23 IST

Samrudhi Mahamarg: परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना-परभणी समृद्धी द्रुतगती महामार्गावरील जमिनीचे दर तब्बल ५९ लाख ७८ हजार रुपये एकरपर्यंत पोहोचले आहेत.

- अभिमन्यू कांबळेपरभणी  - जिल्ह्यातून जाणाऱ्या जालना-परभणी समृद्धी द्रुतगती महामार्गावरील जमिनीचे दर तब्बल ५९ लाख ७८ हजार रुपये एकरपर्यंत पोहोचले आहेत. ज्या गावशिवारांमधून हा मार्ग जाणार आहे, त्या शिवारात ८ ते १० फुटांची फळझाडे आणि विहिरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू असल्याची चर्चा होत आहे. नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड दरम्यान १७९ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग राज्य शासनाने मंजूर केला आहे. या महामार्गासाठी २ हजार २०० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर, परभणी व पूर्णा या चार तालुक्यांतील ४५ गावांच्या शिवारातून हा महामार्ग जाणार आहे. या महामार्गाच्या भूसंपादनासाठी जमीन मोजणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. राज्य शासनाने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला बाजार मूल्याच्या पाचपट दर देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवरच परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी भूसंपादनाचा दर द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार असली तरी या भूसंपादनातून मोठा आर्थिकलाभ मिळवून घेण्यासाठी काही राजकीय नेते मंडळी सरसावली आहे. यातूनच या भागातील जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वेगाने सुरू झाले आहेत.  

मोबदल्याचे आकडे डोळे विस्फारणारे   सेलू तालुक्यातील वालूर येथील एका जमिनीच्या खरेदी-विक्रीचा समोर आलेला व्यवहार या महामार्गावरील जमिनीचे वाढलेले दर स्पष्ट करणारा ठरत आहे. येथील एका शेतकऱ्याची एनए झालेली ४९ आर जमीन विकली गेली. या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य ५९ लाख ७८ हजार रुपये दर्शविले असून, प्रत्यक्ष ठरलेली मोबदल्याची एवढीच रक्कम चक्क आरटीजीएसच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.  १ एकर ९ गुंठे जमिनीसाठी ५९ लाख ७८ हजार रुपये दिले जात असले तरी शासनाकडून जो संभाव्य पाचपटीने मोबदला नंतर मिळणार आहे, तो किती असेल? याचे गणितच भल्या भल्यांची भंबेरी उडविणारे आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtraमहाराष्ट्र