शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पालम तालुक्यात लेंडी नदीला पूर पाच गावांचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:11 IST

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा ...

पालम (परभणी ) : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या दमदार पावसाने लेंडी नदीला पूर आला असून, शनिवारी सकाळी ८ वाजेपासून पाच गावांचा संपर्क ताालुक्याशी तुटला आहे. विशेष म्हणजे या महिन्यात दुसऱ्यांदा या गावांचा संपर्क तुटण्याची घटना घडली.

पालम ते जांभुळबेट या रस्त्यावर शहरापासून अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ ३ फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचा प्रकार वारंवार घडतो. २३ जून रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर ६ फूट पाणी वहात होते. त्यामुळे फळा, आरखेड, सोमेश्वर, घोडा, उमरथडी या गावांचा संपर्क चार तासांपासून तुटला आहे. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १२ या चार तासांसाठी मात्र पाचही गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. यापूर्वी ३ जून रोजी या गावांचा संपर्क तुटला होता.

भाविकांची गैरसोयफळा येथे संत मोतीराम महाराज यांची समाधी आहे. प्रत्येक एकादशीला भाविकांची येथे दर्शनासाठी रांग लागते. शनिवारी एकादशी असल्याने भाविक फळा गावाकडे निघाले. मात्र वाटेत पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागात प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊसriverनदीfloodपूरparabhaniपरभणी