लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीग्रस्त कापसाला शासनाने विनाअट एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बोंडअळीग्रस्त कापूस जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून संताप व्यक्त केला.जिल्ह्यात बोंडअळीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बी.टी.कापूस बियाणांच्या नावाखाली शासनाने शेतकºयांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच संपूर्ण कर्जमाफीच्या प्रकरणामध्ये शेतकºयांची कुचेष्टा होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने शेतकºयांच्या प्रश्नावर गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. प्रादूर्भाव झालेले कापसाचे बोंडे जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून संताप व्यक्त केला.शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, संत्रा उत्पादक शेतकºयांना हेक्टरी १ लाख रुपये अनुदान द्यावे, कृषीपंपाचे वीज बिल माफ करुन २४ तास वीज द्यावी, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा आणि पेरणी ते कापणीच्या कामाचा मनरेगात समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या.प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुरेश इखे, रोहिदास बोबडे, अमित महाराज कांडगे, ओंकार पवार, त्र्यंबक शेळके, शिवाजी जाधव, गणेश बारबोले, गजानन चोपडे, गजानन जाधव, संतोष जाधव, राम ढगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कापसाची बोंडे टाकली जिल्हा परभणी कचेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:34 IST
बोंडअळीग्रस्त कापसाला शासनाने विनाअट एकरी २५ हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी बोंडअळीग्रस्त कापूस जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून संताप व्यक्त केला.
कापसाची बोंडे टाकली जिल्हा परभणी कचेरीत
ठळक मुद्देप्रहार जनशक्तीचे आंदोलन: मदतीची मागणी