तालुक्याच्या ठिकाणी सर्वच खाटा रिक्त
परभणी : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मात्र तालुक्याच्या ठिकाणचे सर्वच बेड सध्या रिक्त आहेत. जिल्ह्यात २ हजार ५३५ खाटांची सुविधा प्रशासनाने केली आहे. त्यापैकी १ हजार १५३ खाटा रिक्त आहेत. त्यातील बहुतांश खाटा तालुक्याच्या ठिकाणच्या आहेत. सध्या परभणीतील आय.टी.आय. हॉस्पिटलमध्ये ५० खाटा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १००, गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात २०, अल्पसंख्यांक मुलीच्या वसतिगृहात ६० तसेच जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्वच्या सर्व खाटा रिक्त आहेत.
दिवसभरात १ हजार ५२ चाचण्या
परभणी : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात १ हजार ५२ नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या करण्यात आल्या. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही या चाचण्या केल्या जात आहेत. मनपा रुग्णालयात १०३, जिल्हा रुग़्णालयात२५, आयटीआय हॉस्पिटलमध्ये ९२, परभणी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत १४४, गंगाखेड तालुक्यात १८२, पालम तालुक्यात १०७, पूर्णा ९९, पाथरी ३३, सेलू २१ आणि मानवत तालुक्यात १३९ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.